मडगाव: बारयाभाट, राय येथील डोंगराला आग लागण्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयन्त मडगाव अग्निशामक दलाने सुरू ठेवले आहेत. मात्र आग लागलेल्या ठिकाणी जाण्यास वाट नसल्याने जवानांना अडचणी येत आहेत.
आम्ही सर्व घटनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिली. या डोंगराच्या खालच्या भागात वाढलेल्या गवताला कुणीतरी मुद्दामहून आग लावली असल्याने, ती पेटत वरच्या भागाला गेली असावी असा संशय सोझा यांनी व्यक्त केला. यापूर्वी या भागात अशा घटना घडलेल्या आहेत.
आम्ही सध्या स्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान आम्हाला या दुर्घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी त्वरित धाव घेतली. आग विझविण्याचे प्रयत्न केले, मात्र डोंगरावर जाऊन आग शमविण्यासाठी वाट नसल्याने आमचा नाइलाज झाला असल्याचे सोझा म्हणाले.
कुंडई औद्योगिक वसाहतीत वीजतारा तुटणे, झुकलेले खांब आणि तारांवर बसणाऱ्या पक्ष्यांमुळे पडणाऱ्या ठिणग्या या कारणांमुळे परिसरातील कोरडे गवत व झुडपांना अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगींचा थेट परिणाम औद्योगिक युनिट्सवर होत असून मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.