Rahul Gandhi's Special Gift to Sonia Gandhi Dainik Gomantak
गोवा

Watch Video: राहुल गांधीच्या कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन, आईला प्रेमाची भेट; गोव्याशी आहे खास नातं

राहुल गांधी यांनी गोव्यातून खरेदी केलेल्या एका पिल्लाचे नाव नूरी असे ठेवण्यात आले आहे.

Pramod Yadav

Rahul Gandhi's Special Gift to Sonia Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कुटुंबात बुधवारी एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. होय, राहुल गांधी यांनी जागतिक प्राणी दिनानिमित्त आई सोनिया गांधी यांना जॅक रसेल टेरियर जातीच्या श्वानाचे पिल्लू भेट दिले आहे.

राहुल गांधी यांनी गोव्यातून खरेदी केलेल्या एका पिल्लाचे नाव नूरी असे ठेवण्यात आले आहे. नूरी या नव्या सदस्याची ओळख राहुल यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना करून दिली.

ऑगस्ट महिन्यात राहुल गांधी यांनी गोव्यातील आकय-म्हापसा येथील ‘अ‍ॅनिमल किंगडम’ या पेट शॉपमधून ‘जॅक रसेल टेरियर’ (Jack Russell Terrier puppies) प्रजातीच्या कुत्र्याची दोन पिल्ले विकत घेतली. राहुल गांधी यांच्या गोवा दौऱ्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर त्यांनी शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी पिल्लू त्यांची आई म्हणजेच सोनिया गांधी यांना भेट दिले आहे. पिल्लाचे नाव 'नूरी' असे ठेवण्यात आले आहे. राहुल आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थान 10, दिल्लीतील जनपथ येथे जाऊन पिल्लांची भेट देतात. सोनिया यांना देखील ही भेट अतिशय आवडली असून, त्या आनंदीत झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

गोव्यातील ‘अ‍ॅनिमल किंगडम’ या पेट शॉपचे सर्वेसर्वा स्टॅनली ब्रागांझा यांच्याकडून राहुल गांधी यांनी ‘जॅक रसेल टेरियर’ प्रजातीच्या दोन पिल्लांची खरेदी केली होती. देशात ‘जॅक रसेल टेरियर’ ही प्रजाती गोव्‍यातच सापडते. 

जॅक रसेल टेरियर ही इंग्लंडमधील श्वानांची एक जात आहे. कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी तयार केले होते. जॅक रसेल टेरियर ही कुत्र्यांची एक खास जात आहे, ज्यांना नजर आणि वास याची उत्तम क्षमता चांगली असते. ही कुत्री अतिशय बुद्धिमान असतात, अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT