Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Rahul Gandhi: "सेंट झेवियर आपल्याला शांततेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो!" राहुल गांधींनी गोमंतकीयांना दिल्या 'फेस्ताच्या शुभेच्छा'

Rahul Gandhi Tweet on Old Goa Feast: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून गोमंतकीयांना तसेच सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.

Akshata Chhatre

Rahul Gandhi Twitter Wish on Old Goa Feast

ओल्ड गोवा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताचा उत्सव म्हणजे फक्त गोव्यातील नाही तर सर्व भाविकांसाठी एक पर्वणीच असते. दरवर्षी ३ डिसेंबरच्या दिवशी हा उत्सव जुन्या गोव्यातील चर्चमध्ये साजरा केला जातो. यंदा फ्रान्सिस झेवियर यांचा दहावर्षांनी एकदा होणार शवप्रदर्शन सोहळा देखील सुरु असल्याने गोव्यात भाविकांची रंग लागली आहे. सेंट झेवियर यांच्या उत्सवानिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून गोमंतकीयांना तसेच सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.

ट्विटर किंवा X च्या पोस्ट मध्ये राहुल गांधी यांनी समस्त गोमंतक वासियांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सेंट झेवियर यांच्या आशीर्वादाने आपल्याला कायम शांतता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा मिळत राहो अशी अशा व्यक्त केली.

फेस्तानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा देखील कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव आणि धर्मगुरू विशेष प्रार्थनासभा घेणार आहेत. लुईस अँटोनियो टॅगले, प्रीफेक्ट ऑफ द डिकास्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन, मुख्य अतिथी असणार आहेत.

आजच्या या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते, मंत्री आणि आमदार यांची उपस्थिती असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT