Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Goa Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Rahul Gandhi silence on Mhadei River dispute: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गोवा भेटीत ते म्हादई प्रश्नावर काय बोलतील, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, या प्रश्नावर त्यांनी एकही शब्द न काढता बगल देणे पसंत केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गोवा भेटीत ते म्हादई प्रश्नावर काय बोलतील, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, या प्रश्नावर त्यांनी एकही शब्द न काढता बगल देणे पसंत केले. राहुल गांधी यांनी गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकच्या हिताला अधिक प्राधान्य दिल्याची भावना गोमंतकीयांकडून व्यक्त करण्यात आली.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकच्या पाणीचोरीवर भाष्य करावे, असे आवाहन आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले होते. त्यामुळे राहुल या प्रश्नावर काय बोलतील, याकडे लक्ष लागले होते. मात्र, या प्रश्नावर त्यांनी अपेक्षाभंग केला. काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची पाठराखण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

येथील एमसीसी मैदानावर आयोजित काँग्रेसच्या ‘गोंय राखण’ यात्रेच्या समारोपप्रसंगी त्यांनी आपले भाषण ‘मतचोरी’पुरतेच मर्यादित ठेवले. युवक व जनता हा देशाचा खरा आत्मा आहे. युवकांना व जनतेला भारतीय जनता पक्षाचे कारनामे हळूहळू समजू लागले आहेत. मतचोरीप्रकरणी केंद्र सरकार व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. येथील सभेत राहुल यांच्या उपस्थितीत ‘गोंय राखण अभियान’ व ‘गोंय राखण संवाद’ या दोन उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.

गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. राहुल म्हणाले, सरकारने आपल्यावर ४५ गुन्हे दाखल केले आहेत; मात्र, ही प्रकरणे न्यायालयात नेली जात नाहीत, कारण न्यायालयात सरकारची बाजू चुकीची ठरेल, याची त्यांना जाणीव आहे, असा दावा गांधी यांनी केला. मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व आसाममध्ये मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

‘राखण यात्रे’ला लोकांचा थंडा प्रतिसाद

दरम्यान, मडगावातील ‘गोंय राखण’ यात्रेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले. आनाफोंत गार्डन येथून सुमारे ४५ ते ५०, तर लोहिया मैदानातून २० ते २५ जण यात्रेत सहभागी झाल्याचे दिसले. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाही काही लोक सभा अर्धवट सोडून बाहेर पडताना दिसले.

पाटकर, बोरकर व्यासपीठावर

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर सभेला उपस्थित होते. त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राहुल गांधी यांचे स्वागत केले. गांधी यांनी आपल्या भाषणात पाटकर यांचा उल्लेख केला. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर व पक्षाच्या अध्यक्षा शवीना शिरोडकर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

राहुल गांधी चालले दोन किलोमीटर

‘गोंय राखण’ यात्रेत सहभागी झालेले राहुल गांधी रविवारी सुमारे दोन किलोमीटर चालले. त्यांच्या फिटनेसचे यावेळी अनेकांनी कौतुक केले.

शिक्षण व्यवस्थेवरही बोट

देशातील शिक्षणव्यवस्था पूर्वी बलस्थान होती; मात्र, गेल्या १५ वर्षांत तिची स्थिती खालावली आहे, अशी टीका गांधी यांनी केली. विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा मारा केला जातो, त्यांच्यावर लाठीमार होतो. शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तींना नियुक्त केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देश व गोवा कोणत्याही एका संघटनेची किंवा पक्षाची मालमत्ता नसून ती जनतेची आहे. या मालमत्तेचा वापर जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

VIDEO: दिलदार केएल राहुल! सामना संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला दिलं सरप्राईज; महागडा फोन केला गिफ्ट

Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT