Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

मडगाव कचरा व्यवस्थापन विधेयकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित

कचरा जाळणे हे महापालिका कर्मचाऱ्यांचे नित्याचेच झाले आहे; शॅडो कौन्सिल फॉर मडगावने उपस्थित केला प्रश्न

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपरिषदेने (SCM) नियुक्त केलेल्या कचरा व्यवस्थापन संस्थेच्या भरमसाट बिले भरण्याबाबत शॅडो कौन्सिल फॉर मडगावने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

SCM संयोजक सॅवियो कुतीन्हो यांनी सांगितले की परिषद एका कंत्राटदाराला दरमहा सुमारे 15 लाख रुपये देत आहेत, घरोघरी कचरा गोळा करुन आणि कचरा वेगळा करून गार्बेजस्पॉट्स साफ करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या मुद्द्यांवर एससीएमने उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.

“मडगावमध्ये (Margao) कचरा जाळणे ही एम.एम.सी साठी वैज्ञानिक पद्धत मानुन रस्त्याच्या कडेला साफसफाई आणि काळे डाग साफ करताना मनपा उद्यान, आना फोंटे बागेतील कचरा जाळणे हे महापालिका कर्मचाऱ्यांचे नित्याचेच झाले आहे. अशा जाळण्यामुळे होणारे प्रदूषण आमच्या अधिकार्‍यांना चिंतेचे वाटते,” असे कुतीन्हो म्हणाले.

एस.सी.एम ने घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन वेगळ्या पद्धतीने होत नाही तसेच, गार्बेज स्पॉट्सवरील कचरा एका जागी जमा होऊन जाळला जातो, हे कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या नियमांच्या विरोधात आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शनिवारी एजन्सीच्या कामगारांनी रावणफोंड येथील ओव्हर ब्रिजजवळ साचलेला कचरा गोळा करून तो वेगळा करून कौन्सिलच्या वाहनांना देण्याऐवजी जाळून टाकल्याचे कांथो यांनी निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT