म्हापसा: कोलवाळ येथील कारागृहाची सुरक्षा व्यवस्था बेभरंवशाची बनली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज तुरुंग रक्षकालाच ड्रग्स घेऊन कारागृहात प्रवेश करताना आयआरबीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तुरुंग रक्षक सूरज गावडे याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे तुरुंग रक्षकांचे कैद्यांशी असलेले लागेबांधेही उघड झाले आहेत.
(Question mark over Kolwal prison security)
काही दिवसांपूर्वी या कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकाला ड्रग्सप्रकरणी अटक झाली होती. आज तुरुंग रक्षक सूरज गावडे याची कारागृहात प्रवेश कऱण्यापूर्वी आयआरबी पोलिसांनी तपासणी केली, असता त्याच्याकडे 4 ग्रॅम ड्रग्स सापडले. ते कोकेन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. या प्रकरणाची माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याची तक्रार कोलवाळ पोलिसांत नोंदवली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
विकट भगतसाठी आणले अमली पदार्थ
तुरुंग रक्षक गावडे याने हे कोकेन अंडर ट्रायल कैदी विकट भगत याला देण्यासाठी आणले होते. भगत हा विदेशी महिलेवरील बलात्कार आणि खूनप्रकरणी सध्या कारागृहात आहे. गावडे सकाळी ड्युटीवर रुजू होण्यासाठी आला होता. गावडे याने बॅगमधील गणवेशाच्या खिशात हे ड्रग्स लपवून ठेवले होते.
"तुरुंग रक्षक सूरज गावडे याच्याकडे ड्रग्स सापडले आहे. पोलिसांना त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याला अटक करून गुन्हा दाखल झाल्यावर कारागृह खात्यामार्फत कारवाई केली जाईल."
- वासुदेव शेट्ये, अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.