Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

Querim Sattari theft: दोनमाड, केरी - सत्तरी येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी बाजार परिसरातील तब्बल पाच दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यात एकूण किती सामान चोरीस गेले याची माहीती अद्याप मिळालेली नाही.

Sameer Panditrao

वाळपई: दोनमाड, केरी - सत्तरी येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी बाजार परिसरातील तब्बल पाच दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यात एकूण किती सामान चोरीस गेले याची माहीती अद्याप मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोनमाड बाजारातील पाच दुकाने रात्रीच्यावेळी चोरट्यांनी फोडली. दुकानावरील छतावरील पत्रे, व नळे काढुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. बाहेरून चोरट्याना दुकानांचा अंदाज आला नाही. चोरट्यांनी फोडलेली काही दुकाने एक सलुन, होलसेल दारूचे दुकान व अन्य दुकानांचा समावेश होता. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केले आहे.

केरी आऊट पोस्टवर पोलिस रात्रीच्यावेळी गस्त घालत नसल्याने केरी भागात दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दोन चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या चोरट्यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. तसेच चार दिवसांपूर्वी दोन दुचाकी चोरी होण्याचा प्रकार घडला होता.

मात्र, घरातील कुटुंबांना जाग झाल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढली होती. याची तक्रार पोलिसांना देण्यात आली, परंतु अद्याप कोणत्याही प्रकरणाचा छडा लावला गेला नाही. त्यामुळे पोलिसांनी संबंधित चोरट्यांना तत्काळ गजाआड करावे व चोरीच्या घटना रोखाव्यात अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

सालेली - सत्तरी येथे सकाळच्यावेळी एका घरात चाकूद्वारे महिलेला जखमी करून घरात दरोडा घालत घरातील सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला महिना उलटला तरी पोलिसांनी चोरट्याला पडलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT