Querim Forest Hunting Dainik Gomantak
गोवा

Querim Forest Hunting: केरीच्या जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढल्याचा संशय; वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर?

Forest Safety Goa: केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रातील श्री आजोबा देवस्थानाच्या मागील घनदाट जंगलासह परिसरात रात्रीच्या वेळी शिकाऱ्यांचा वावर वाढल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल: केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रातील श्री आजोबा देवस्थानाच्या मागील घनदाट जंगलासह परिसरात रात्रीच्या वेळी शिकाऱ्यांचा वावर वाढल्याचा संशय व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातून येणारे शिकारी या भागात फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी स्फोटकांचा वापर होत असल्याच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात एका कुत्र्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या जबड्याला झालेली दुखापत पाहता, शिकारीसाठी ठेवलेल्या स्फोटकाचा स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्फोटकांच्या वापराची पूर्वीही घटना

सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी पालये-केरी पठारावर एका कुत्र्याच्या तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याने त्याचा मृत्यू झाला होता. रानडुकरांची शिकार करण्यासाठी असे स्फोटक ठेवले जात असल्याची चर्चा त्या वेळी होती.

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून, स्फोटकांचा वापर माणसांच्या जीवितालाही धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे वन खात्याने आणि संबंधित यंत्रणांनी या भागात विशेष मोहीम राबवून शिकाऱ्यांचा शोध घ्यावा, जंगलात गस्त वाढवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Inez Creek Pollution: सांतिनेज खाडीच्या प्रदूषणाचा मुद्दा तापला! ताळगाव ग्रामसभेत मलनिस्सारणासह उघड्यावर शौचाचा प्रश्न गाजला

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांची धडक; पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात, अनेक जण जखमी VIDEO

खरी कुजबुज: भाजपविरोधक साष्टीवर निर्भर?

Ishan Kishan Injury Update: टीम इंडियाला मोठा धक्का! तिसऱ्या टी-20 सामन्यातूनही ईशान किशन बाहेर; BCCI ने दिली दुखापतीबाबत मोठी अपडेट

Digital Banking: 'पूर्वी फोन बँकिंग, आता घरोघरी डिजिटल बँकिंग'; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT