Querim checkpost beef transport Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Querim checkpost beef transport: सत्तरीतील केरी चेकपोस्टवर बेळगावहून मडगाव येथे बेकायदेशीर पद्धतीने गोमांस वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने पकडला.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरीतील केरी चेकपोस्टवर बेळगावहून मडगाव येथे बेकायदेशीर पद्धतीने गोमांस वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने पकडला.

वाहन कर्नाटक पासिंग (केए-२२ एए-६३८९) असून त्यात सुमारे २००० किलोपेक्षा अधिक निकृष्ट दर्जाचे व अस्वच्छ गोमांस सापडले. पोलिसांनी वाहनचालकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यातील गेल्या दोन दिवसांतील ही तिसरी घटना असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, काही गोप्रेमी व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी केरी पोलिस चेकपोस्टवर हा टेम्पो पकडला. वाहन तपासणीदरम्यान उघड्यावर ठेवलेले, दुर्गंधीयुक्त मांस आढळले. वाहनचालक दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले असून, चौकशीदरम्यान त्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.

तेच वाहन पुन्हा पकडले!

पोलिसांनी बेळगाव येथील मन्झूर मन्सूर शेख (रा. बेळगाव) याला टेम्पोसहित अटक केली आहे. या घटनेपूर्वी आठ दिवसांपूर्वी याच वाहनातून मोर्ले येथे दोन टन गोमांस जप्त करण्यात आले होते, तर रविवारी पहाटे ४०० किलो गोमांस घेऊन जाणारी इनोव्हा कार व दुपारी मोर्ले येथे ८०० किलो मास जप्त झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

SCROLL FOR NEXT