Quepem Canal Cow Rescue  Dainik Gomantak
गोवा

Quepem: कालव्‍यात पडलेल्‍या गाईला सुखरूप काढले बाहेर; केपे येथील घटना

Quepem Canal Incident: दोन दिवस पाण्यात पडलेली एक गाय आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होती

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: केपे येथील पोप जॉन विद्यालयाजवळ असलेल्या कालव्यात एक गाय पडली होती. गेले दोन दिवस ती पाण्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत होती. या घटनेविषयी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुणीच गाईला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले नाहीत. अखेर आज याविषयी कुडचडे येथील युवकांना माहिती मिळताच त्यांनी केपे येथे धाव घेऊन गाईला पाण्याबाहेर काढले.

केपे येथील हा कालवा पाण्याने भरून वाहत आहे. कालव्याच्या शेजारी वासरांना चरण्यासाठी बरेच गवत उपलब्ध असल्याने केपे भागातील गुरे या ठिकाणी चरण्यासाठी येतात. मात्र, चारा असलेल्या ठिकाणाजवळच हा कालवा असल्याने काहीवेळा गुरे घसरून या कालव्यात पडतात, असे लोकांनी सांगितले.

गेले दोन दिवस पाण्यात पडलेली एक गाय आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होती व या गाईला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आले नसल्याने कुडचडे येथील युवकांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

SCROLL FOR NEXT