Arrest Dainik Gomantak
गोवा

Quepem Theft: वाघाच्या टॅटूमुळे सापडला चोर! केपे सराफ दुकान चोरी प्रकरणात महिला ताब्यात, पोलिसांची पुण्यात धडक कारवाई

Quepem Jewellery Theft: २२ मार्च रोजी केपे येथील भवानी गोल्‍ड दुकानात ही चोरी झाली होती. लहान मुलासाठी दागिने खरेदी करायचे आहेत, असे सांगून तीन संशयित महिला या दुकानात शिरल्‍या होत्‍या.

Sameer Panditrao

मडगाव: गुन्‍हा करताना कुठलाही गुन्‍हेगार आपल्‍या काही खुणा त्‍या ठिकाणी सोडून जातो आणि या अशा खुणाच त्‍या गुन्‍हेगाराला पोलिसांच्‍या पाशात अडकवतात. केपे येथे भवानी गोल्‍ड या सराफी दुकानात झालेल्‍या चोरीसंदर्भातही असेच घडले.

या प्रकरणात केपे पोलिसांनी अटक केलेल्‍या जया बडगुजर या महिलेने आपल्‍या हातावर वाघाचा टॅटू कोरला होता. ज्‍या ठिकाणी चाेरी झाली त्‍या ठिकाणी सापडलेल्‍या सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये चाेरी करणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेच्‍या हातावर तसा वाघाचा टॅटू असल्‍याचे दिसून येत हाेते.

ज्‍यावेळी केपे पाेलिस पुण्‍यात चौकशीसाठी गेले त्‍यावेळी तिथे एका महिलेच्‍या हातावर अशाचप्रकारचा टॅटू असल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे स्‍थानिक पोलिसांच्‍या साहाय्‍याने संशयावरून त्‍या महिलेला ताब्‍यात घेतले असता, ती चोरी आपणच केली हाेती, अशी तिने कबुलीही दिली.

या संशयित महिलेला केपे न्‍यायालयाने दिलेला चार दिवसांचा पोलिस कोठडीचा रिमांड आज संपत असल्‍याने आज तिला परत एकदा न्‍यायालयात हजर केले असता, न्‍यायालयाने तिच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड एक दिवसाने वाढवून दिला.

दरम्‍यान, या संशयित महिलेने केपे न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून उद्या हा अर्ज सुनावणीस येण्‍याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील अन्‍य दोन संशयित अद्याप फरारी आहेत.

२२ मार्च रोजी केपे येथील भवानी गोल्‍ड दुकानात ही चोरी झाली होती. लहान मुलासाठी दागिने खरेदी करायचे आहेत, असे सांगून तीन संशयित महिला या दुकानात शिरल्‍या होत्‍या. वेगवेगळ्‍या प्रकारचे दागिने पाहण्‍याच्‍या बहाण्‍याने त्‍यांनी दुकानावर असलेल्‍या महिलेला गुंतवून ठेवून तिची नजर दुसरीकडे गेल्‍याची संधी साधून एक सोन्‍याची साखळी, एक कंठहार आणि दोन सोन्‍याच्‍या अंगठ्या असा एकूण ३.७८ लाखांचा ऐवज पळविला होता.

Crime theft

तांत्रिक इन्‍टेलिजन्‍सचा पोलिसांकडून प्रभावी वापर

या चोरट्यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी केपे पोलिसांनी तांत्रिक इन्‍टेलिजन्‍सचा प्रभावी वापर केला. अशाप्रकारच्‍या चोऱ्या बहुतेक संघटित टोळ्‍या करतात आणि अशा चोऱ्या करण्‍याची पद्धतही एकसारखीच असते, हे तत्त्व ध्‍यानात ठेवून केपे पोलिसांनी राष्‍ट्रीय क्राईम पोर्टलवर अशाप्रकारच्‍या आणखी कुठे चोऱ्या झाल्‍या आहेत का, हे पाहण्‍यास सुरुवात केली असता, हल्‍लीच्‍याच दिवसात केरळ राज्‍यातील कलमासरी पाेलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत अशी चाेरी झाल्‍याचे दिसून आले.

या चोरीतही तीन महिलांचा समावेश होता. त्‍यामुळे केरळ पोलिसांकडून या संशयित महिलांची माहिती मागवली असता केरळ पोलिसांनी पाठविलेली छायाचित्रे सीसीटीव्‍हीत कैद झालेल्‍या संशयितांच्‍या छबीशी मिळतीजुळती असल्‍याचे दिसून आले. केरळ पोलिसांकडून गोवा पोलिसांना संशयितांचे आधारकार्डही मिळाले हाेते. त्‍यावर ठाणे-मुंबई येथील पत्ता होता. त्‍यामुळे या घटनेची चौकशी करण्‍यासाठी केपेचे उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्‍यासह पोलिस शिपाई प्रणय नाईक, अमीर नाईक, वीणा दातेकर आणि दीक्षा झोरे यांचे पथक ठाण्‍याला पाठविण्‍यात आले.

ठाणे-मुंबईत जाऊन चौकशी

चौकशी करून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, या पथकाने ठाणे-मुंबईत जाऊन चौकशी केली असता, तिथे एका घरात या तीन महिला राहत होत्‍या. मात्र, हल्‍लीच त्‍यांनी ते घर सोडले, अशी माहिती पाेलिसांना मिळाली. त्‍यामुळे खरे तर पोलिसांवर हात हलवीत परत येण्‍याची वेळ आली हाेती; पण नंतर पोलिसांना यातील एक महिला पुण्‍यात राहत असल्‍याची माहिती एका माणसाकडून मिळाली.

उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांची समयसूचकता

पुण्‍यातील भारतीय विद्यापीठ भागातील पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत ही महिला वास्‍तव्य करून राहत असल्‍याची माहिती प्राप्‍त झाल्‍यानंतर केपे पोलिसांनी त्‍या भागात जाऊन प्रत्‍येक घराची तपासणी केली. सुमारे २०० घरे या परिसरात होती. मात्र, संशयित नेमकी कोण हे कळत नव्‍हते. मात्र, उपनिरीक्षक बोंद्रे यांना त्‍या भागात एक महिला दिसून आली. तिच्‍या हातावर ताे वाघाचा

टॅटू होता. जसा त्‍या सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यावर आढळून आलेल्‍या महिलेच्‍या हातावर होता. त्‍यामुळेच स्‍थानिक पोलिसांच्‍या साहाय्‍याने केपे पोलिसांनी त्‍या महिलेला ताब्‍यात घेऊन चौकशी केली आणि शेवटी तिनेही आपला गुन्‍हा कबूल केला. या चोरीत लंपास केलेले काही दागिने या संशयित महिलेकडेच होते. केपे पाेलिसांनी ते दागिनेही जप्‍त केले. उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांनी दाखविलेली समयसूचकता शेवटी अशी कामी आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT