Margao Ravindra Bhawan Dainik Gomantak
गोवा

तियात्रांचा दर्जा सुधारला, पण सन्मान दूरच!

प्रिन्स जेकब यांची खंत पाय तियात्रिस्त आगुस्तिनो फर्नांडिस यांना आदरांजली

दैनिक गोमन्तक

तियात्र सादरीकरणाचा दर्जा सुधारला आहे, तियात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. परंतु अजून तियात्र तसेच तियात्र कलाकारांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत तियात्रिस्ट प्रिन्स जेकब यांनी व्यक्त केली. रवींद्र भवन मडगावने पाय तियात्रिस्त जुवांव आगुस्तिनो फर्नांडिस यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तियात्राचा प्रसार ज्या प्रमाणे व्हायला पाहिजे, तसा तो होताना दिसत नाही. तियात्रांचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी तियात्र लेखन, कांतारा लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण यामध्ये तरुणांना प्रशिक्षित करणे व त्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे महत्त्वाचे असल्याचे जेकब म्हणाले.

रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी तियात्रिस्तांना लागेल ती मदत मिळेल,असे आश्र्वासन दिले. तियात्रांमध्ये युवा पिढी रस घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या युवकांचा आत्मविश्र्वास वाढविणे गरजेचे आहे. रवींद्र भवन हे कलाकारांचे घर असून येथे सर्वांना योग्य न्याय मिळेल,असेही तालक यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी आगुस्तिनो यांची नात शालिनी फर्नांडिस, त्यांचा पणतू सनी फर्नांडिस, उपाध्यक्ष मनोहर बोरकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT