Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: गोव्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसेच नाहीत! केंद्र सरकार मदत करेल असे वाटले होते...

वेस्टर्न बायपाससाठी निधी वापरल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची माहिती

Akshay Nirmale

Nilesh Cabral on PWD Fund: एकीकडे राज्यातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असताना रस्ते दुरूस्तीसाठी निधीच नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी म्हटले आहे.

त्यामुळे रस्त्यातील खड्डे भरले जाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. तत्काळ काम हाती घेण्यासाठी पुरेसा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) निधी नाही, असे काब्राल यांनी म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल आणि बांधकाम यासाठी तरतूद करण्यात आलेली 90 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय मर्यादा विभागाने संपवली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHA) राज्याचा निधी वापरून वेस्टर्न बायपासचे बांधकाम हाती घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यापुढे निधीची समस्या वाढली आहे.

विभागाने या प्रकल्पावर आतापर्यंत 165 कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यापैकी चालू आर्थिक वर्षात 70 ते 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

वेस्टर्न बायपासचा खर्च आमच्या डोक्यावर येईल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. केंद्र सरकार आम्हाला साथ देईल असे वाटले. NHA ने या प्रकल्पासाठी निधी द्यायचा होता.

आम्ही प्रकल्प होल्डवर ठेवू शकत नाही कारण तो गरजेचा आहे आणि त्यावर उच्च न्यायालय देखील लक्ष ठेऊन आहे. कामावर परिणाम होणार नाही, हे पाहण्यासाठी कंत्राटदारालाही वेळेत पैसे देणे आवश्यक आहे. म्हणून, आम्ही आमचे रस्ते दुरूस्तीचे बजेट थकवले आहे.

पैसे दुसऱ्या कामात वळवायचे होते. आता आम्हाला एकत्रित निधीतून पैसे वापरावे लागतील.

चालू आर्थिक वर्षासाठी, PWD साठी एकूण अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे 2600 कोटी रुपये होते. काब्राल यांच्या मते 90 कोटी रुपये राज्यातील रस्त्यांसाठी राखून ठेवले होते.

काब्राल म्हणाले की, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विभागाला अतिरिक्त निधी देण्याबाबत राष्ट्रीय खेळांनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक घेणार आहे. मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनाही परिस्थितीची जाणीव आहे. नॅशनल गेम्समुळे मुख्यमंत्री व्यस्त आहेत.

यावर लवकरच तोडगा निघेल. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रस्ते दुरूस्ती सुरू होईल. एकत्रित निधीतून पैसे मिळाल्यानंतर, कार्यादेश जारी करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT