Bad Roads In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: किती खड्डे बुजवले याची नोंदच नाही! ‘साबांखा’चा सावळागोंधळ

Goa Roads: रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला १५ दिवस पूर्ण झाले तरी अद्याप शंभर टक्के काम पूर्ण झाले की नाही याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील रस्त्यांवरील सर्व खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ७ ऑगस्ट रोजी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला १५ दिवस पूर्ण झाले तरी अद्याप शंभर टक्के काम पूर्ण झाले की नाही, याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाही.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे संचालक उत्तम पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम विभाग कार्यालयांना दिल्याचे सांगितले. राज्यातील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविले की नाही आणि किती टक्के काम पूर्ण झाले आहे, याची नोंद खात्याने ठेवणे अनिवार्य आहे; परंतु ही नोंद खाते ठेवत नसल्याचे संचालकांच्या उत्तरावरून स्पष्ट झाले.

दर्जेदार साहित्य नसल्यानेच खड्डे

राज्यातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यांसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप केवळ विरोधकांकडूनच नव्हे, तर स्थानिकांकडून देखील केला जात आहे. पावसाचे निमित्त करून विभागीय कार्यालयांनी खड्डे बुजविण्यात चालढकल केली. मात्र, आता पाऊस कमी झाल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविणे आवश्यक होते. तरीही ते बुजविले जात नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कामांचा अहवाल कुठाय?

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयांना त्यांच्या विभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम दिले आहे. मात्र, विभागीय कार्यालयांकडून वेळेत काम होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याकडून रोज अहवाल घेणे आवश्यक आहे. अहवाल मागितला असता तर आज किती टक्के राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात सरकारला यश आले, हे स्पष्ट झाले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

SCROLL FOR NEXT