Purumentachem Fest Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगेतील पुरुमेंताच्‍या फेस्तात फेरीवाल्यांची पळापळ; पावसामुळे साहित्य खराब, ताडपत्र्या गेल्या उडून

Purumentachem Fest Sanguem: अनेक दुकानांवरील प्लास्टिक, ताडपत्र्या वाऱ्यांसोबत तुटून हवेत उडून गेल्‍याने दुकानदारांची धांदल उडाली. शिवाय त्‍यांना मोठा आर्थिक फटकाही बसला.

Sameer Panditrao

सांगे: येथील पुरुमेंताच्‍या वार्षिक फेस्ताच्‍या फेरीला यंदा पावसाचे ग्रहण लागले आहे. जोरदार पडत असलेल्‍य मान्‍सूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांनी फेरीवाल्यांची अक्षरशः दाणादाण उडविली आहे. अनेक दुकानांवरील प्लास्टिक, ताडपत्र्या वाऱ्यांसोबत तुटून हवेत उडून गेल्‍याने दुकानदारांची धांदल उडाली. शिवाय त्‍यांना मोठा आर्थिक फटकाही बसला.

सदर फेस्ताची फेरी पाच दिवस असते. पण पुढील दोन-तीन दिवस अनेक व्यापारी ग्राहक मिळेल या आशेने ठाण मांडून असतात. पण यंदा सुरवातीपासूनच फेरीला पावसाचे ग्रहण लागले आहे.

Purumentachem Fest Goa

त्‍यामुळे अनेकांनी आपली दुकाने गुंडाळण्यास सुरवात केली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने ग्राहक फेरीत फिरकत नाहीत. दुकान उघडून बसल्यास पावसाळी पाण्याने साहित्‍य खराब होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

गोबीवाल्यांना दणका

सांगे आरोग्य खात्याने यंदा गोबी मंच्‍युरियनवाल्याना जबरदस्त दणका दिला. स्वछतेअभावी एक-दोन दिवसांतच ही दुकाने बंद करावी लागली. एकूणच यंदा फेरीवाल्याना या ना त्या कारणाने जबरदस्त नुकसान सहन करावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT