Purple Fest Goa 2025 Dainik Gomantak
गोवा

Purple Fest Goa: जगातील सर्वात मोठी अगरबत्ती; गोव्यातील आंतरराष्ट्रीय 'पर्पल फेस्ट'मध्ये दरवळला सुगंध!

world’s tallest incense stick: गोवा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आजपर्यंतची सर्वात उंच अगरबत्ती प्रज्वलित करून नवा विक्रम करण्यात आला

Akshata Chhatre

International Purple Fest 2025: समावेशकता, आरोग्य आणि भारताचा समृद्ध सुगंधी वारसा यांचा गौरव करण्यासाठी, गोवा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आजपर्यंतची सर्वात उंच अगरबत्ती प्रज्वलित करून नवा विक्रम करण्यात आला.

अग्रगण्य धार्मिक आणि होम वशिर्प ब्रँड असलेल्या 'सायकल प्युअर अगरबत्ती'ने पर्पल फेस्टमध्ये १२५ फूट उंचीची अगरबत्ती सादर करून आणि ती पेटवून इतिहास रचला. पर्पल फेस्ट हा समावेशकता आणि सुलभतेचे समर्थन करणारा जागतिक कार्यक्रम आहे. राज्यात ९ ते १२ ऑक्टोबर पर्यंत हा पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

विक्रमी अगरबत्तीचा सुगंध, उद्देश समावेशकता

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, कलाकार, खेळाडू आणि विशेषतः दिव्यांग समुदायाचे प्रतिनिधी असलेल्या शेकडो 'चेंजमेकर्स'च्या उपस्थितीत ही अगरबत्ती शनिवार (दि.११) रोजी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी पारंपारिक विधी, नवोपक्रम आणि संवेदी उत्सव यांचा सुंदर मिलाफ अनुभवला गेला.

या अगरबत्तीच्या निर्मितीमध्ये जांभळ्या रंगाच्या कोबीसोबतच पवित्र मानल्या जाणाऱ्या शंखपुष्पीचा वापर करण्यात आला आहे. शंखपुष्पी फुलाचे औषधी, आरोग्यवर्धक आणि स्मरणशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. पर्पल फेस्टची संकल्पना 'वेलनेस' (आरोग्य) आणि सामुदायिक उत्थानाशी जोडलेली असल्यामुळे या घटकांची निवड करण्यात आली. या अगरबत्तीचा शांत आणि उपचारात्मक सुगंध उत्सवस्थळी दरवळला.

उत्सवाला 'सायकल प्युअर'ची भावनिक आदरांजली

एन. रंगा राव अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन रंगा यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “सायकल प्युअरमध्ये आमचा विश्वास आहे की सुगंध केवळ एक विधी नसून तो आठवण, आदर आणि नूतनीकरण आहे. ही १२५ फूट उंचीची 'पर्पल अगरबत्ती' जगात प्रकाश आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आमची आदरांजली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “पर्पल कोबी आणि शंखपुष्पीचा सुगंध वापरून आम्ही समावेशकतेची भावना आणि प्रेरणा देणारा सुगंध तयार केला आहे. पर्पल फेस्ट ही एक चळवळ आहे आणि आम्हाला याचा भाग असल्याचा सन्मान वाटतो.” सायकल प्युअरने यापूर्वीही अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान म्हैसूर, गोवा आणि मुंबई येथे १११ फूट आणि अयोध्या येथील भरतकुंड महोत्सवात १२१ फूट उंचीच्या अगरबत्त्या प्रज्वलित केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT