Purple Fest Car  Dainik Gomantak
गोवा

Purple Fest Goa: ब्लाइंड कार रॅलीचा थरार; सहभागींमध्ये प्रचंड उत्साह

Panjim: या रॅलीमध्ये दृष्टिदोष असलेल्या व्यक्ती या दिशादर्शक (नेव्हिगेटर) होत्या तर ब्रेल लिपीतील नकाशे त्यांचे मार्गदर्शक होते.

दैनिक गोमन्तक

Purple Fest Goa: वैविध्यतेचा सोहळा ठरत असलेल्या पर्पल फेस्टमध्ये प्रथमच आयोजित अंधांसाठीच्या कार रॅलीचा उपक्रम यशस्वी झाला तसेच ऐतिहासिक क्षण ठरला. या रॅलीमध्ये दृष्टिदोष असलेल्या व्यक्ती या दिशादर्शक (नेव्हिगेटर) होत्या तर ब्रेल लिपीतील नकाशे त्यांचे मार्गदर्शक होते.

शनिवारी पार पडलेल्या या अनोख्या कौशल्याचे प्रदर्शन करणाऱ्या रॅलीमध्ये वैयक्तिक स्पर्धकांनी आपले कौशल्य पणास लावत अवलंबनाचा खरा अर्थ सादर केला.

गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते तसेच गोवा राज्याचे विकलांग व्यक्तींसाठीचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री पूजा बेदी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये अंधांसाठीच्या या कार रॅलीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या रॅलीमध्ये देशभरातून आलेले 35 स्पर्धक आपल्या 35 कारसह तसेच 40 नेव्हिगेटर स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळी 10 वाजता आयनॉक्स परिसरात या रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर मिरामार सर्कलला वळसा घालून ही रॅली पणजीतील जुन्या पुलावरून यू-टर्न घेत चोगम मार्गावरून कळंगुट चर्च आणि तेथून परत प्रारंभाच्या ठिकाणीपर्यंत धावली.

गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, या अनोख्या अंधांसाठीच्या कार रॅलीसाठी पुढाकार घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ पणजी आणि त्यांचे सर्व सदस्य यांचा मी खूप ऋणी आहे. पर्पल फेस्ट उपक्रमादरम्यान असे अनेक क्षण प्रत्येकजणांच्या आय़ुष्यात कायमचे संस्मरणीय ठरणार आहेत.

आज रॅलीचा निकाल

दृष्टिदोष असलेले दिशादर्शक आणि दृष्टी असलेले चालक यांनी एकत्रपणे काम करत समन्वय, संवाद आणि परस्परावलंबित्वाचा अनुभव सादर केला. ब्रेल लिपीतील नकाशांच्या आधारे आणि दिशादर्शकाच्या सूचनांच्या आधारे चालकांनी मार्गक्रमण केले. खरोखरच ही रॅली ऐतिहासिक, वैविध्यतेचा सोहळा ठरली.

या रॅलीच्या यशस्वी सांगतेनंतर सहभागी झालेल्या प्रत्येकाने जल्लोषात आनंद साजरा केला. रविवार, 8 जानेवारी रोजी या ‘ब्लाइंड कार’ रॅलीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

एकमेकाला मदत करण्यासाठी, आधार देण्यासाठी, चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी लोक एकत्र आल्याचे पाहणे हा एक सुखद असा अनुभव आहे. - पूजा बेदी, टीव्ही अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT