Amir Khan, Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Aamir Khan Goa Visit: 'कहां जा रहें हैं हम? गोवा'! मि. परफेक्शनिस्ट आमीर खान येणार पर्पल फेस्टला; मंत्री फळदेसाईंनी दिले निमंत्रण

Aamir Khan Purple Fest: यंदाचा पर्पल फेस्टला ग्लॅमर प्राप्त होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनी या महोत्सवासाठी गोव्यात येण्याचे मान्य केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: यंदाचा पर्पल फेस्टला ग्लॅमर प्राप्त होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनी या महोत्सवासाठी गोव्यात येण्याचे मान्य केले आहे. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली आणि त्यांना यासाठी निमंत्रित केले आहे.

राज्यात १५ ते १७ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कार्यक्रमात पर्पल फेस्ट च्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. हा महोत्सव संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकलांग व्यक्तींच्या अधिकारांवरील कराराच्या तत्वांशी सुसंगत आहे, तसेच संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड यांच्या पाठबळासह हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या भेटीवेळी दिव्यांग आयुक्तालयाचे सचिव ताहा हाजिक हेही उपस्थित होते. या महोत्सवात विकलांग व्यक्तींच्या कलात्मक प्रतिभा सादर करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणाकरीता विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, स्पर्धा तसेच आरोग्य तपासणी शिबिरे यांचे आयोजन केले जाईल.

या वर्षीचा पर्पल फेस्ट विशेषत्वाने “अभिव्यक्ति आणि समावेश” या विषयाभोवती फिरणार असून, विविध क्षेत्रातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी व गैरसरकारी संघटनांची सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती आमीर खान यांना यावेळी देण्यात आली.

मंत्री फळदेसाई म्हणाले, “गोवा या महोत्सवासाठी आदर्श ठिकाण आहे. या माध्यमातून विकलांग व्यक्तींना समाजात आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळेल. आमिर खान यांच्यासारख्या व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमाला खूपच प्रेरणादायी ठरेल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

SCROLL FOR NEXT