Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Purple Fest Goa 2025: १५ हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज असल्याचे प्रतिपादन दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या समस्यांवर विचारमंथन करत त्यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने यंदा ९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान राज्यात आंतरराष्‍ट्रीय ‘पर्पल फेस्ट’चे आयोजन केले आहे.

देश-विदेशातील सुमारे १५ हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज असल्याचे प्रतिपादन दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई केले.

ते गोवा मनोरंजन संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खात्याच्या संचालक वर्षा नाईक, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर, सचिव तहा हाजीक, अनुपमा पिळगावकर, प्रकाश कामत उपस्थित होते.

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वा. गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात पर्पल फेस्टचे उद्‌घाटन होणार असून या सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहतील.

इतर राज्यांसाठी प्रेरणादायी

पर्पल फेस्टचे आयोजन करून करोडो रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप अनेकजण करतात; परंतु या ‘फेस्ट’द्वारे दिव्यांगांच्या सर्वसमावेशकतेबाबत जागृती केली जाते. दिव्यांगांसाठी सुविधा उभारल्या जातात, उपयुक्त नवतंत्रज्ञान त्यांना पुरविण्यात येते, आवश्‍यक उपकरणे पुरविली जातात. त्यामुळे ‘पर्पल फेस्ट’ ही एक चळवळ असून भारतातील इतर राज्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

लिफ्टचे अनावरण

पर्पल फेस्टदरम्यान दिव्यांगांच्या सुलभीकरणासाठी गोवा मनोरंजन संस्था, जुने गोवे वैद्यकीय महाविद्यालय आदी पुरातन इमारतींमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्यात आली असून या सुविधेचे लोकार्पण मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

२५ देशांतील प्रतिनिधींची नोंदणी

‘पर्पल फेस्ट’साठी २५ देशांतील प्रतिनिधींनी नोंदणी केली असून संयुक्त राष्‍ट्र संघटनेचे प्रतिनिधी ‘फेस्ट’दरम्यान पाचही दिवस कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

या महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री, अभिनेते तसेच विविध राज्यांचे मंत्री, देशभरातील विविध राज्यांचे दिव्यांग आयुक्त येणार असून दिव्यांग आयुक्तांची विशेष परिषदेचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी विविध क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी ‘पर्पल फेस्ट’मध्ये काय?

दिव्यांगत्वाचे आतापर्यंत २१ प्रकार अधिकृत मानले गेले आहेत त्या सर्व प्रकारच्या दिव्यांगाच्या समस्या आणि भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी २५ परिसंवादांचे आयोजन.

पर्पल फेस्टदरम्यान सुमारे २ हजाराहून अधिक दिव्यांगांना मोफत उपकरणाचे वाटप.

दिव्यांगाच्या अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे २०० हून अधिक स्टॉल्स.

दिव्यांगांच्या विविध ६५ चाचण्या केवळ १० मिनिटांत करणाऱ्या उपकरणाद्वारे करणार तपासणी.

दिव्यांगांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्याधारित कार्यशाळांचे आयोजन.

दोन ‘थेरपी व्हॅन’चे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी व इतर सुविधा त्यांच्या घरापर्यंत जाऊन देण्याच्या उद्देशाने दोन थेरपी व्हॅनचे लोकार्पण या फेस्टदरम्यान करण्यात येणार आहे. एक उत्तर गोवा आणि दुसरी दक्षिण गोवा येथील आवश्‍यक असणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा पुरवेल. आतापर्यंत २५० दिव्यांगांना विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत, २२ इमारती दिव्यांग सुलभ करण्यात आल्या, अजून ३० इमारतींचे काम प्रगतीपथावर आहे, असे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT