NIA  Dainik Gomantak
गोवा

NIA Raid: गोवा, कर्नाटकच्या हद्दीत ISIS चे दहशतवादी तळ; NIA च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड

Pramod Yadav

NIA And Pune Police Raid On ISIS : पुणे पोलीस आणि राष्ट्रीय दहशतवादी पथक (NIA) यांनी केलेल्या छापेमारीत दिल्लीतून ISIS च्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशात 18 ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत ते होते. शिवाय गोवा, महाराष्ट्र यासह कर्नाटकच्या हद्दीत देखील त्यांचे तळ होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

या संयुक्त कारवाईत मुहंमद शाहनवाज आलम उर्फ अब्दुल्ला उर्फ मोहम्मद इब्राहिम उर्फ प्रिन्स, मुहंमद अर्शद वारसी आणि मुहंमद रिजवान अश्रफ या तिघांना अटक केली आहे.

शाहनवाजची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी इतरांना अटक केली. शाहनवाजवर तीन लाखांचे बक्षीस होते.

शाहनवाज आणि अन्य एकाला दिल्ली तून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर, तिसऱ्या संशयिताला दिल्लीबाहेरून अटक करण्यात आली. दहशतवादी मॉड्युल उत्तर भारतात काही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होते.

दिल्लीत राहून शाहनवाज आयएसआयएसच्या स्लीपर सेलसाठी लोकांची भरती करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. सध्या शाहनवाजच्या चौकशीच्या आधारे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पुण्यातील एका घटनेत फरार असलेला शाहनवाज दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून तो दिल्लीत राहत होता.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यातील पश्चिम घाट, कर्नाटकात हुबळी आणि उडुपी, महाराष्ट्रात लवासा (पुणे), महाबळेश्वर (सातारा) तसेच केरळमधील वन परिसरात त्यांनी तळ उभारले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT