Lonavala Accident Dainik Gomantak
गोवा

Lonavala Accident: ‘शो’ ठरला अखेरचा, गोव्यातील 2 मित्र लोणावळ्यातील अपघातात ठार; बार्देश शोकाकुल

Goa Bardez youths accident: : पुण्यात आयोजित ‘कार व बाईक शो’ पाहण्यासाठी गेलेल्या बार्देशातील दोन तरुणांचा लोणावळ्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: पुण्यात आयोजित ‘कार व बाईक शो’ पाहण्यासाठी गेलेल्या बार्देशातील दोन तरुणांचा लोणावळ्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अँबी व्हॅली मार्गावरील लायन्स पॉइंटजवळ शनिवारी सकाळी साडेसहा वाजता भरधाव टेंपो आणि मोटारीची समोरासमोर धडक झाल्याने दर्शन सुतार (२१, आसगाव) आणि मयूर वेंगुर्लेकर (२४, शिवोली) हे जागीच ठार झाले.

दोघेही मोटरस्पोर्ट्सचे जिद्दी चाहते असून मित्रांसह खास या शोसाठी पुण्यात गेले होते. मात्र कार्यक्रमानंतर परतताना त्यांचा करुण अंत झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, लायन्स पॉइंटहून लोणावळ्याकडे भरधाव वेगाने येणारी मोटार (जीए ०३ एएम ०८८५) समोरून येणाऱ्या टेंपोवर (एमएच १४ जेएल ५५२५) आदळली.

धडक इतकी जोरदार होती की मोटारीचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. दोघे तरुण वाहनातच अडकून पडले होते. घटनास्थळी तत्काळ लोणावळा शहर पोलिस व शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम दाखल झाली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

मित्र मुक्कामी, दोघेच निघाले होते कारने

दहा ते बारा जणांचा मित्रगट ॲम्बी व्हॅलीतील शो पाहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पुण्यात गेला होता. त्यांच्यातील एका मित्राने शोमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. शो संपल्यानंतर दर्शन आणि मयूर हे दोघेच कारने गोव्याकडे रवाना झाले; बाकीचे मित्र मुक्कामीच थांबले होते. दर्शन इवेंटमध्ये काम करायचा. तसेच खासगी वाहनचालक म्हणूनही कार्यरत होता.

वीजखांबाला धडक; युवकाचा अखेर मृत्यू

म्हापसा : कोलवाळ येथे वीजखांबाला दुचाकीची धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीस्वार राकेश सामल (२२, रा. रेवोडा) याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.५) पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. या अपघातात राकेश सामल हा गंभीर जखमी झाल्याने त्याला गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT