Goa Beach Party | Sound Pollution  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Party: गोव्याच्या बीचवरील ध्वनी प्रदूषणावर आता 'पोलिश' तंत्रज्ञानाचा वॉच, पुण्यातील कपंनीकडे काम

राज्यातील 12 समुद्रकिनाऱ्यांवरील ध्वनी प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आता 'पोलिश तंत्रज्ञान'चा वापर केला जाणार आहे.

Pramod Yadav

Sound Pollution On Goa Beaches: गोव्यात होणाऱ्या बीचवरील संगीत पार्टी आणि त्याद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण हा नेहमीच वादातीत मुद्दा राहिला आहे. राज्य सरकार गोव्याच्या किनार्‍यावरील ओपन-एअर पार्ट्या आणि कार्यक्रमांमुळे होणारा गोंगाट कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यातील 12 समुद्रकिनाऱ्यांवरील ध्वनी प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आता 'पोलिश तंत्रज्ञान'चा वापर केला जाणार आहे. यासाठी पुण्यातील एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

याबाबत Velan Technologies या कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला आहे. अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) चे अध्यक्ष महेश पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर कंपनीद्वारे EU आणि युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या मानदंडांची पूर्तता करणारी उपकरणे बसवली जाणार आहेत.

गोवा पर्यटन आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाची गोव्यातील बहुतेक किनारी भागात हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये किंवा पंचायतींना उपकरणे बसवण्यासाठी जागेसाठी विनंती केली जाणार आहे. उपकरणे बसवण्यासाठी एक ते दोन महिने लागतील असेही पाटील यांनी म्हटले आहे.

यंत्रणा बसवल्या जाणाऱ्या 12 समुद्रकिनाऱ्यांमध्ये बागा, कळंगुट, कांदोळी, वागातोर, कोलवा, मोरजी आणि इतर बीचचा समावेश आहे.

किनारपट्टी भागात ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत, कारवाईसाठी तिथे जाण्यापूर्वी आयोजक सावध होतात आणि आवाज कमी करतात. यापुढे ध्वनी मर्यादा दर्शवणारे डिजिटल फलक स्थानिक पोलिस ठाणे, तसेच उपजिल्हाधिकारी आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात लावले जातील. यामुळे आवाज मर्यादेचे उल्लंघन होताच आयोजकांविरोधात कारवाई केली जाईल. असे पाटील यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तीन कनिष्ठ संशोधक ध्वनी प्रदूषण संबधित सर्व माहितीवर लक्ष ठेवतील. तुमच्याकडे परवानगी असली तरी तुम्ही निर्धारित केलेली वेळ आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करू शकणार नाही. असेही पाटील यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT