माया खरंगटे Dainik Gomantak
गोवा

माया खरंगटे यांच्या ‘घडटां घडयतां’ कांदबरीचे प्रकाशन

या कादंबरीतून खरंगटे यांनी कोकणी साहित्याची नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: लेखिका माया खरंगटे यांच्या "घडटां घडयतां" या कांदबरीचे प्रकाशन रविवारी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये झाले. या प्रसंगी डॉ. जयंती नायक , डॉ. हनुमंत चोपडेकर, नयना अडारकर, रजत हेगडे व लेखिका माया खरंगटे व्यासपीठावर उपस्थित होत्या. कादंबरी ही कोकणी साहित्याची खरी ओळख असल्याचे डॉ. चोपडेकर यांनी सांगितले. या कादंबरीतून खरंगटे यांनी कोकणी साहित्याची नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

खरंगटे यांच्या लेखनात वास्तवाचा स्पर्श जाणवतो. ही आई-वडिलांच्या संघर्षाची कहाणी असल्याचे कादंबरीवर बोलताना नयना अडारकर यांनी सांगितले. खरंगटे सारख्या लेखिकेमुळे कोकणी कादंबरी समृद्ध होत चालली आहे,असे डॉ. जयंती नायक यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. लेखिकेने ही कादंबरी नीला तेलंग या मैत्रिणीला अर्पण केली आहे.रजत हेगडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT