या भागातील रहिवाश्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणा बद्धल निषेध व्यक्त केला. Dainik Gomantak
गोवा

फोंडले येथील खचलेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणा बद्धल निषेध व्यक्त केला.मोबाईल केबल घालण्यासाठी खणलेल्या चरामुळे रस्ता खचण्याची प्रक्रिया वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैगीण-गालजीबाग रस्ता फोंडले (Fondale road) येथे खचत आहे. ही खचण्याची प्रक्रिया गेली दोन वर्षे चालू आहे मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा (Department of Public Works) ग्रामीण रस्ते विभाग दुर्लक्ष करीत आहे.या ठिकाणी हा रस्ता गालजीबाग नदीच्या पात्राला समांतर असून रस्ता व नदी किनारा याच्यामध्ये अर्धामीटरही अंतर नाही. किनाऱ्याला संरक्षक भिंत नाही त्यातच रस्त्याच्या कडेला मोबाईलचे केबल घालण्यासाठी चर खणल्याने रस्ता खचण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.हे खचणे असेच चालू राहिल्यास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची पाळी येणार आहे.सद्या चाररस्ता ते माशे पर्यंतच्या बगल चारपदरी हमरस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीत वाढ झाली आहे. त्यामुळे खचणाऱ्या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी आहे.

आज येथील रहिवाश्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणा बद्धल निषेध व्यक्त केला.मोबाईल केबल घालण्यासाठी खणलेल्या चरामुळे रस्ता खचण्याची प्रक्रिया वाढली आहे.चर खणताना या संदर्भात पैगीण पंचायती कडे तक्रार करूनही पंचायतींने काहीच कारवाई केली नसल्याचे डायगो डिसिल्वा व आग्नेल बार्रेटो यांनी सांगितले.यावेळी या भागाचे माजी पंच कायतान बार्रेटो व अन्य रहिवासी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT