Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात भूमिगत वाहिन्यांचे जाळे विणण्यासाठी 160 कोटींची तरतूद

दैनिक गोमन्तक

फोंडा: भूमिगत वीजवाहिन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना कोणत्याही समस्या उरणार नाहीत. मडकई, फोंडा, शिरोडा व प्रियोळ अशा चारही मतदारसंघांत भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे विणण्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

(provision of Rs 160 crore has been made for power works informed Power Minister Sudin Dhavalikar)

तळुले-बांदोडा येथील गजानन हनुमान सभागृहात आज मडकई मतदारसंघातील पहिल्या टप्प्यातील उंडीर व दुर्भाट फिडरच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी वीजमंत्री ढवळीकर यांनी मडकई मतदारसंघातील विविध विकासकामांची ग्वाही दिली.

व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, वीज खात्याचे सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर, मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, वीज खात्याचे विभाग दहाचे कार्यकारी अभियंता पी. पी. भरतन, साहाय्यक अभियंता केशव गावडे, कनिष्ठ अभियंता अजय परांजपे आणि सनसिटीचे कंत्राटदार रोहन गर्ग आदी उपस्थित होते.

ढवळीकर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. ढवळीकर यांनी मडकई येथील क्रीडा संकुल व सभागृह, उंडीर फुटबॉल मैदान, उद्यान तसेच सभागृह आदींचे बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असून भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे मतदारसंघातील सहाही पंचायत क्षेत्रात करण्यात येईल. नोव्हेंबरच्या मध्यानंतर मतदारसंघातील रस्त्यांच्या डांबरीकरणास प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

चार महिन्यांत 180 कोटी महसूल : मी वीज खात्याचा ताबा घेतल्यानंतर महसूल वाढीवर भर दिला. ग्राहकांचे समाधान आणि सुरळीत वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न करताना उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होणार नाही, यावर कटाक्ष ठेवला असून गेल्या चार महिन्यांत 180 कोटी महसूल वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT