कामगारांना सेवेत घ्या, मगच लीज!- प्रमोद सावंत

‘सेसा’च्या कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांकडे धाव; कामगारांना सेवेत घेण्याच्या अटीवरच लीज -डॉ. प्रमोद सावंत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

डिचोली: कामगारांचे हित जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. खाणी सुरू करताना सध्याच्या कामगारांना सेवेत घ्यावेच लागेल. तशी अट संबंधित लीजधारक कंपन्यांना घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली आणि डिंगणे येथील सेसा (वेदांता) कामगारांना दिले.
(CM Pramod Sawant statement about Lease workers)

CM Pramod Sawant
मडगावात चक्क न्यायालयच बनले तळे!

कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या हालचाली सेसा (वेदांता) कंपनी व्यवस्थापनाने सुरू केल्या आहेत. तशी नोटीसही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना जारी केली आहे. आधीच भविष्याच्या चिंतेने अस्वस्थ बनलेले सेसाचे कामगार कंपनीच्या या निर्णयामुळे भयभीत झाले आहेत.

आज (गुरुवारी) सकाळी या कामगारांनी साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. डिचोली येथील 'एम्प्लॉईज युनियन ऑफ सेसा मायनिंग' संघटनेचे पदाधिकारी आणि डिंगणे येथील मिळून 177 कामगार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते.

डिचोलीतील कामगारांचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यावेळी उपस्थित होते. कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कामगारांशी संवाद साधताना कामगारांवर अन्याय होणार नाही त्याची सरकार काळजी घेईल, अशी ग्वाही दिली.

CM Pramod Sawant
नोकरीसाठी पैसे मागितल्या प्रकरणी दोघांना अटक

- आमचे भवितव्य सरकारच्या हाती
आमचे भवितव्य आता सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. सरकारवरच आमची भिस्त आहे, असे डिचोलीतील सेसा कामगारांनी म्हटले आहे. कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यांच्या नेतृत्वाखाली ‘एम्प्लॉईज युनियन ऑफ सेसा मायनिंग’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली.
या परिषदेस संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, दीपक पोपकर, राजेश गावकर, महेश होबळे, अनिल सालेलकर, संजय मांद्रेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


'कामगारांना काढून टाकण्यासंबंधीची नोटीस जारी केल्याची माहिती मिळाल्यानंतर मी लगेच कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून बोलणी सुरू केली. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कामगार आयुक्तांकडेही हा विषय नेण्यात येईल."
- डॉ. प्रमो'द सावंत, मुख्यमंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com