Mandovi Hotel Dainik Gomantak
गोवा

‘मांडवी’ हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर निदर्शने केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राजधानी पणजीतील ऐतिहासिक मांडवी हॉटेल 2019 मध्ये बंद पडल्यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन, ग्रॅज्युटी आणि भविष्य निर्वाह निधी मधील पैसे मिळाले नाहीत, गेल्या तीन वर्षांपासून यासंबंधी चर्चा करूनही पैसे मिळाले नसल्याने दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर निदर्शने केली.

मांडवी हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2019 मध्ये हॉटेल बंद केले. मात्र हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे आर्थिक सेटलमेंट केली नसल्याने कर्मचाऱ्यांकडे पैसे नाहीत. पुढे कोरोना सुरू झाला. यातील काही कर्मचारी निवृत्त झाले, तर काही निवृत्तीच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आता नव्याने नोकरी मिळणे अशक्‍य झाले आहे. सेवानिवृत्ती रक्कमही दिल्या नाहीत. भविष्य निर्वाह निधीचे पैसेही संबंधित कार्यालयाकडे जमा केले नाहीत. याबाबत कामगार आयुक्तांकडे तक्रारी केल्या असून त्या वैयक्तिक स्वरुपातही केल्या आहेत.

हॉटेल मांडवीमध्ये मी 13 वर्ष नोकरी केली. मालकांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता 2019 मध्ये अचानकपणे हॉटेल बंद केले. त्यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी 30 वर्षापेक्षा जास्त नोकरी केली आहे. मात्र त्यांना कोणत्याच प्रकारच्या आर्थिक फायदे मिळाले नाही. याशिवाय नियमित वेतन मिळाले नाही. सध्या अनेक कर्मचारी निवृत्ती इतके वयस्कर झालेत. नव्याने नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे हॉटेल कंपनीने आमचे देय रक्कम ताबडतोब द्यावी.

- अच्युत धोंड, कर्मचारी हॉटेल मांडवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT