Mobile Tower Dainik Gomantak
गोवा

Ponda News: मोबाईल टॉवरविरोधात विद्यालयाच्‍या गेटपाशी मुलांसह पालकांचे आंदोलन

कसलये ग्रामस्‍थ आक्रमक : मुलांना शाळेत न पाठविण्‍याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News: कसलये-उसगाव येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने पालकांनी मुलांसह शाळेच्‍या गेटजवळ बसून आज बुधवारपासून आंदोलनाला सुरवात केली.

जोपर्यंत मोबाईल टॉवर इतर ठिकाणी उभारण्याचे आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी सांगितले. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नवीन शैक्षणिक वर्षापासून मुलांना इतर विद्यालयात पाठविण्याचा इशारा पालकांनी दिला.

कसलये गावातील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोबाईल टॉवरला विरोध करून पालकांनी अनेक खात्यांना निवेदने दिली होती. फोंडा भागशिक्षणधिकाऱ्यांना निवेदन दिल्यास एक महिना उलटून गेला.

परंतु पालकांच्या निवेदनावर विचार न करता शाळेच्या आवारात अचानक मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यामुळे पालकांनी मुलांना विद्यालयात न पाठविण्याचा निर्णय घेऊन गेटजवळील रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. या शाळेत एकूण ८९ मुले आहेत.

टॉवरसाठी खोदलेला खड्डा मुलांसाठी धोकादायक

1) मुलांना सध्या विद्यालयाची जागा अपुरी पडत आहे. वर्ग बांधण्यासाठी ही जागा आम्ही ठेवली होती. परंतु विद्यालयाच्या प्रांगणात मोबाईल टॉवर उभारल्‍यास मुलांची अधिक गैरसोय होणार आहे.

2) या ठिकाणी मोठा खड्डा खोदलेला आहे. त्‍या खड्ड्यात मुले पडून अनर्थ घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे या मोबाईल टॉवरमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

3) त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन हा टॉवर इतर ठिकाणी उभारावा, अशी मागणी एक पालक उल्हास गावडे यांनी केली, तर विद्यालयाच्या प्रांगणात मोबाईल टॉवर उभारण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

4) अचानक या कामाला सुरवात करण्‍यात आल्‍याने मुलांना विद्यालयाच्या प्रांगणात फिरणे धोकादायक बनले आहे. टॉवर अन्‍य ठिकाणी उभारण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असे नीलिमा गोवेकर यांनी सांगितले.

मोबाईल टॉवरविरोधात आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. टॉवर इतर ठिकाणी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही. फक्त तो विद्यालयाच्‍या आवारात नको. असे असतानाही जबरदस्‍तीने टॉवर विद्यालयाच्‍या आवारात उभारण्‍याचा प्रयत्न झाल्‍यास नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व मुलांना अन्‍य विद्यालयात पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. - राजेंद्र गावडे, पालक-शिक्षक संघ अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT