Goa environmentalists Protest in Delhi Dainik Gomantak
गोवा

Protest In Delhi : दिल्लीत ‘जंतर मंतर’वर निदर्शने; जुने गोवेत बेकायदा बांधकाम

केंद्राचे लक्ष वेधण्याचा आप, गोवा फॉरवर्डचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Environmentalists Protest in Delhi: जुने गोवे येथील वारसा स्थळ परिसरात ‘सीआरझेड’चे उल्लंघन करून बेकायदा बांधलेला बंगला पाडण्यासाठी सरकारकडून कारवाईसाठी कोणतीच पावले उचलली जात नसल्याचा आरोप करत आज काही समाजकार्यकर्ते व राजकारण्यांनी दिल्लीतील ‘जंतर मंतर’ येथे केंद्रातील सरकारचे या बेकायदा बंगल्याकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली.

गेल्या दोन वर्षांपासून सीआरझेड क्षेत्रात असलेल्या या बंगल्याविरोधात उपोषण व निदर्शने करूनही अजूनही कारवाई होत नसल्याबद्दल या समाजकार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली.

नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर निदर्शने करण्यासाठी गेलेल्यांमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रतिमा कुतिन्हो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे विकास भगत यांच्यासह अनेक समाजकार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सीआरझेडचे उल्लंघन करून दुरुस्तीसाठी परवाना घेऊन या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यापूर्वीच पंचायतीने तो मोडण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र राज्य सरकार या बंगल्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी छुपा पाठिंबा देत आहे. त्यामुळे या सरकारवर विश्‍वास नाही.

केंद्र सरकारने या बेकायदा बंगल्यासंदर्भातची दखल घेऊन राज्य सरकारला निर्देश देण्यासाठी ही निदर्शने करण्यात आल्याचे विकट भगत यांनी सांगितले.

नव्याने सुनावणीचे निर्देश

या बंगल्याच्या मालकाने उच्च न्यायालयात नगर व शहर नियोजन खात्याने त्यांची बाजू ऐकून न घेता दिलेला परवाना रद्द करून बांधकाम मोडण्याचा आदेश जारी केला होता. त्याला आव्हान देण्यात आले होते.

या आव्हान याचिकेवरील सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणावरून नगर व शहर नियोजन खात्याचा आदेश रद्दबातल ठरवून मालकाला दिलासा दिला होता. खात्याने बंगल्याच्या मालकाला नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिली नव्हती.

त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणात खोलवर न जाता तांत्रिक चुकीमुळे आदेश रद्द करून नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश खात्याला दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT