Protest Against illegal building in old goa Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यातील सत्याग्रह 100 दिवसांनंतरही सुरुच

अजूनही अनधिकृत बांधकाम न पाडल्याने स्थानिकांचा संताप

दैनिक गोमन्तक

ओल्ड गोवा : ओल्ड गोव्यातील अनधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक नागरिकांनी सुरु केलेल्या सत्याग्रहाला आता 100 दिवस झाले आहे. 100 दिवसांनंतरही अजूनही प्रशासनाकडून ओल्ड गोवा परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडलं न गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे बांधकाम पाडण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पंचायतीकडे अनेकवेळा पाठपुरावाही केला आहे, मात्र 100 दिवस उलटूनही हा अनधिकृत बंगला पाडण्यात न आल्याने सत्याग्रह करणारे आणखी आक्रमक झाले आहेत. (Protest Against illegal building continues after 100 days in old goa News Updates)

ओल्ड गोवा (Old Goa) पंचायतीने यापूर्वीच संबंधित अनधिकृत बंगल्याच्या मालकाला नोटीस बजावली होती. तसंच हा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याचे आदेशही पंचायतीकडून नोटीसीमार्फत देण्यात आला होता. स्थानिकांनी 100 दिवस आपला सत्याग्रह चालवला आहे, मात्र असं असलं तरीही संबंधित मालकाने हा अनधिकृत बंगला अद्यापही पाडलेला नाही. 100 दिवसांनंतरही प्रशासनाने बंगल्यावर कारवाई न केल्याने स्थानिकांनी आपलं आंदोलन (Protest) आणखी तीव्र केलं आहे. दरम्यान बंगल्यावर कारवाई होईपर्यंत स्थानिकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत ओल्ड गोव्यातील या अनधिकृत बंगल्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसंच ओल्ड गोव्यातील नागरिकांनी 100 दिवसांनंतरही इमारत तोडेपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तीन महिन्यांहून जास्तकाळ चाललेल्या आंदोलनानंतर आता ओल्ड गोवा पंचायत कधी कारवाई करते हे पाहावं लागणार आहे. या अनधिकृत इमारतीमुळे ओल्ड गोव्यातील हेरिटेजला (Heritage) धोका निर्माण झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT