Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem News : कामुर्ली-तुये फेरीबोट धक्क्याचे काम बंदच

अपघाताची शक्‍यता : सार्वजनिक बांधकाम खात्‍याने १० लाख रुपये देऊनही कंत्राटदार सुस्‍त

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे तालुक्यातील कामुर्ली-तुये या जलमार्गावरील दोन्ही बाजूचे फेरीबोट धक्का (रॅम्प) उभारण्याचे काम गेल्‍या सहा महान्यांपासून बंद आहे. त्‍यामुळे ऐन पावसाळ्यात फेरीबोटी चालविण्यास धोका संभवतो अशा आशयाचे पत्र कर्मचाऱ्यांनी नदीपरिवहन खात्याला लिहून ही फेरीबोट सेवा धोक्यात आल्‍याचे म्‍हटले आहे.

कामुर्ली ते तुये जलमार्गावरील फेरीबोट धक्क्याच्या कामाची वर्कऑर्डर सप्टेंबर २०२१ मध्ये देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या कंत्राटदारास हे काम दिले आहे, त्याने तब्‍बल दोन वर्षांनी काम सुरू केले. आता काम सुरू केले खरे पण केवळ पाण्यात लाकडाचे खांब उभारले आणि ते काम अर्धवट ठेवले.

जवळपास सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्‍यामुळे फेरीबोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नदीपरिहन खात्याला धोक्याबाबत सतर्क केले आहे.विशेष म्‍हणजे कंत्राटदाराला खात्‍याने मे २०२३ मध्ये दहा लाख रुपये दिले आहेत, पण अजूनही काम सुरू झालेले नाही.

रायबंदरचे कामही त्‍यालाच

आश्‍‍चर्यजनक बाब म्हणजे याच कंत्राटदाराला तिसवाडी तालुक्यातील रायबंदर येथील फेरीबोट रॅम्प रुंदीकरणाचे ८० लाखांचे कामही दिले गेले आहे. परंतु आता संबंधित कंत्राटदारास रॅम्प बांधण्याचा अनुभव आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. फेरीबोटीतून दररोज शेकडो प्रवाशी येजा करतात. त्‍यामुळे धक्क्याचे काम त्वरित होणे आवश्‍यक असताना कंत्राटदाराकडून चालढकल होत आहे. आता या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT