Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

भजन कलेतून धर्म, संस्कृतीचे रक्षण: मायकल लोबो

वासुदेव रेडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित अखिल गोवा भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

दैनिक गोमन्तक

कळंगुट: गावोगावी सादर करण्यात येत असलेल्या भजनी कलेमुळे धर्म तसेच संस्कृतीचे रक्षण होते. त्यामुळे या कलेचे संवर्धन व्हायला हवे, तसेच ही कला भावी पिढीला समजण्यासाठी, या कलेच ते पारंगत होणे गरजेचे आहे, असे मत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी हडफडे येथे व्यक्त केले.

दिवानभाटी-हडफडे येथील केडीआर बॉयज ऑफ आरपोरा येथे श्रीआरवेश्वर देवस्थानच्या प्रांगणात वासुदेव रेडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित अखिल गोवा भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोबो उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार दिलायला लोबो, सेबेस्तियांव पिंटो, साब्रीना पिंटो, हडफडेंचे माजी सरपंच आगुस्तिनो डिसौझा, केडीआर बॉयजचे अध्यक्ष जयदीप गाड, हडफडे पंचायतीच्या उपसरपंच व्हायलेटा डिसोझा, पंच सदस्य राजेश मोरजकर, स्पर्धेचे परिक्षक राया कोरगांवकर, सुमेधा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलायला लोबो म्हणाल्या, हडफडे गावात अखिल गोवा मर्यादित भजनी स्पर्धा तीन वर्षापासून आयोजन करणाऱ्या केडीआर बॉयजचे कौतुक आहे. यापुढेही अशाच स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्या. पंचक्रोशीतील जेष्ठ भजनी कलाकार दयानंद वि. दिवकर, तुकाराम मधुकर दीवकर, संजीत नारायण हरमलकर, सदानंद शांताराम पेडणेकर, तसेच शाबी विष्णू मांद्रेकर (मरणोत्तर) यांचा आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.भजन स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष मुरुडकर, रोशन रेडकर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT