Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa School : राज्यात नव्याने 102 शाळांचे प्रस्ताव

मान्यता मिळणे कठीण : 500 शाळांची झाली दुरुस्ती

Vilas Ohal

शिक्षण खात्याकडे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी नव्याने 102 शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाले आहेत. परंतु सध्याच्या घडीला या प्रस्तावांना मंजुरी मिळणे कठीण दिसत आहे. नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शिक्षण खात्याची कसरत सुरू झाली आहे. त्यामुळे हे नवे प्रस्ताव विचाराधीन येतील की नाही, याची शक्यता फारच कमी आहे.

यासंदर्भात, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणाले की, संचालनालयाकडे यावर्षी नव्या प्राथमिकचे 54, माध्यमिकचे 21 आणि उच्च माध्यमिकचे 27 प्रस्ताव सादर झालेले आहेत. या प्रस्तावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यात एका बाजूला सरकारी शाळा बंद होत आहेत.

तर दुसरीकडे असे प्रस्ताव दाखल होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यात काही उच्च वर्गीय कुटुंबांचा विचार करूनही शाळांचे प्रस्ताव आलेले असल्याचे प्रथमदर्शनी समजून येते. अनेक ठिकाणी सरकारी शाळांना शिक्षक नाहीत, म्हणून शाळा बंद झाल्या आहेत. शिवाय विद्यार्थी संख्या कमी असल्यास ते विद्यार्थी इतर शाळेत पाठविण्याचा विचार सरकारने चालविला होता.

2011 मध्ये होत्या 1200 प्राथमिक शाळा

राज्य सरकारच्या कागदोपत्री 2011 मध्ये 1200 प्राथमिक शाळा होत्या. विद्यार्थी संख्या कमी होऊन ती ७०० वर आली आहे. त्यातील 500 शाळांची दुरुस्ती करण्यात आली. तर 200 शाळांची देखभाल दुरुस्ती करायची की नाही, याचा शिक्षण खाते अजूनही विचार करीत आहे. कारण त्या शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याचा अहवाल आहे. शाळांची दुरुस्ती करूनही मुले आली नाही तर असा प्रश्‍न सतत खात्याला सतावत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT