CCTV Cameras Dainik Gomantak
गोवा

CCTV Camera: मुळगाव बगलमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव : सरपंच तृप्ती गाड

CCTV Camera: मुळगावहून दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या बगलमार्गावर कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

CCTV Camera: मुळगावहून दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या बगलमार्गावर कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे. ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी बगलमार्गावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा पंचायतीचा प्रस्ताव आहे, अशी माहिती मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड यांनी दिली.

कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कचरा टाकणाऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड देण्याचा पंचायतीचा विचार चालू आहे, असेही सरपंच गाड यांनी सांगितले.

पंचायतीतर्फे दारोदारी कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. अधूनमधून स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. तरीदेखील कचरा काही पंचायतींची पाठ सोडत नाही. काही ठरावीक भागात तर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत. कचरा टाकणाऱ्यांच्या या वृत्तीमुळे पंचायत पुरती हतबल झाली आहे.

असे सरपंच गाड यांनी सांगितले. तसेच गावाला कचरामुक्तीसाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन सरपंचांनी केले आहे.

अस्ताव्यस्त कचरा

मुळगाव-दोडामार्ग रस्त्यावर कचऱ्याची समस्या मोठी गंभीर आहे. सध्या या बगलमार्गाला कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. या मार्गावर सुका आणि ओला मिळून प्रचंड प्रमाणात कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेला आहे. या कचऱ्यामुळे बगलमार्गावर सध्या विदारक चित्र दिसून येते. हा कचरा कोठून येतोय, त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी या बगलमार्गावरून ये-जा करणारे हा कचरा टाकतात, असा पंचायतीला संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Giorgia Meloni Photo: डीपफेकच्या विळख्यात इटलीच्या PM! बनावट फोटो व्हायरल करणाऱ्या युजरला मेलोनींनी झापलं; प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एआयचा वापर

Sarvan Comunidade Land Scam: सर्वण कोमुनिदादची 25 हजार मीटर जमीन परस्पर फस्त, मोठा आर्थिक घोटाळा उघड; गावकऱ्यांना अंधारात ठेवून बिल्डरला जमिनीची विक्री

Grah Gochar 2026: नशिबाचा 'डबल' धमाका! पाच राशींना मिळणार भाग्याची साथ; सूर्य-शुक्र आणि शुक्र-गुरुचा 'द्विद्वादश योग' ठरणार वरदान

खरी कुजबुज: आता तरी होणार का गोवा सरकार ‘स्मार्ट’?

Curchorem Sexual Assault Case: लज्जास्पद कबुलीनंतर आता बेकायदेशीर अटकेचा ठपका, क्राईम ब्रँचची मोठी नाचक्की; कुडचडे वासनाकांडातील सोहमला मिळणार जामीन?

SCROLL FOR NEXT