Santa Cruz Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Santa Cruz Gramsabha: सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभेत घरपट्टीचा विषय चर्चेला येण्यापूर्वीच मागील ग्रामसभेत अपशब्द वापरल्याने माफी मागण्याच्या कारणावरून ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपल्याचा आरोप ग्रामस्थांनी रविवारी ग्रामसभेत केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Santa Cruz Panchayat Gramsabha

पणजी: सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभेत घरपट्टीचा विषय चर्चेला येण्यापूर्वीच मागील ग्रामसभेत अपशब्द वापरल्याने माफी मागण्याच्या कारणावरून ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपल्याचा आरोप ग्रामस्थांनी रविवारी ग्रामसभेत केला आहे.

राज्यातील कुठल्याही पंचायतीच्या घरपट्टीची तुलना सांताक्रुझ पंचायतीशी केली तर सर्वात अधिक घरपट्टी या पंचायतीत आकारण्यात येते. हे चुकीचे असून त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असा प्रश्न ग्रामस्थ एल्सा फर्नांडिस यांनी ग्रामसभेत उपस्थित केला होता. मात्र, त्यांचा प्रश्न न घेताच उपसरपंच संदीप सावंत यांनी ग्रामसभा आटोपती घेतली.

सांताक्रूझ पंचायतीच्या सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंचानी ग्रामसभा घेतली. उपसरपंच संदीप सावंत यांनी सांगितले कि, गेल्यावेळी ग्रामसभेत जे अपशब्द वापरले होते त्यासंदर्भात माफी मागावी असे आम्ही सांगितले होते, परंतु ते न झाल्याने ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.

माफी न मागितल्याने ग्रामस्थ संतापले

सांताक्रुझ ग्रामसभेत बाजार संकुल आणि पंचायत घराचा ठराव मंजूर. शांततापूर्ण चालू असलेल्या ग्रामसभेत दोन सदस्यांनी माफी न मागितल्याने ग्रामसभा रद्द. मागील ग्रामसभेत दोन सदस्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यावर ग्रामस्थांची त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होती.

सर्वसामान्यांवर अन्याय!

सांताक्रुझ पंचायतीने घरपट्टी हस्तांतरण करण्यासाठी पैसे वाढवून ते २५ हजार रुपये केले आहे. सामान्य लोकांना हे परवडणारे नाही. तसेच जुने घर असेल तर त्यांच्या घरपट्टीत १० टक्के वाढ करण्यात आली आणि जुने घर मोडून, त्याच ठिकाणी घर बांधले तर प्रति चौरस मीटर १५ रु. घरपट्टी आकारण्यात येते. हे चुकीचे असून सामान्य जनतेवर होणार अन्याय आहे. आम्ही बोलायला गेलो तर ग्रामसभेत बोलू देखील देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT