Court | Dainik Gomantak
गोवा

Goa News: फ्रेंच व नेपाळी महिलांमधील मालमत्ता वाद न्यायालयात

कळंगुट येथील घराच्या मालमत्तेवरून फ्रेंच अभिनेत्री मारियाने बोर्गो हिने बंदिवासात ठेवल्याप्रकरणीचा दावा केला होता.

दैनिक गोमन्तक

Goa News: कळंगुट येथील घराच्या मालमत्तेवरून फ्रेंच अभिनेत्री मारियाने बोर्गो हिने बंदिवासात ठेवल्याप्रकरणीचा दावा केला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यात तथ्य नसून मालमत्तेवरून बोर्गो व नेपाळी महिलेमध्ये वाद सुरू आहे.

पोलिसांनी बंदीवासाचा दावा फेटाळून लावला आहे. बोर्गो हिने सुरक्षेसाठी काही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे तर तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी नेपाळी महिलेने काही बाऊन्सरची मदत घेतली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

फ्रेंच अभिनेत्री असलेल्या महिलेने उच्च न्यायालयात या घराच्या मालमत्तेसंदर्भात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला व नागरी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. बोर्गो हिने तिला बंदिवासात ठेवल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते.

तेव्हाच समजेल मालमत्तेचा खरा मालक

सध्या कळंगुट येथे ज्या घरामध्ये ही फ्रेंच महिला राहते, त्या घराच्या खरेदीसाठी तिने पैसे मोजल्याचे पोलिसांना सांगितले. तर नेपाळी महिलेने केलेल्या दाव्यामध्ये ती या मालमत्तेच्या मूळ मालकाची पत्नी आहे. तिच्या पतीचे निधन झाले आहे.

त्यामुळे आता हा मालमत्तेचा प्रश्‍न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयातील निर्णयानंतरच या मालमत्तेचा खरा मालक समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao: 'गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला खाण व्यवसाय नकोच'! मुळगाववासीय ठाम; रात्रपाळीला विरोध

Goa Crime: 'तुला काम देतो', सांगून व्हिडीओ केला रेकॉर्ड; लैंगिक अत्‍याचारप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

Goa Politics: खरी कुजबुज; राजकारण्‍यांना अचानक गोमातेचा कळवळा

Goa Politics: 'विरोधकांनी आरशात बघा, नरकासुर दिसेल', कामतांचा टोला; पर्वरी उड्डाणपुलाबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

Goa Rain: दिवाळी संपली, आता छत्र्या शोधा! गोव्यात 3 दिवस पाऊस कोसळणार; ‘यलो अलर्ट’ कायम Video

SCROLL FOR NEXT