Action on Goa Illegal Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Shacks : कांदोळी, कळंगुट किनाऱ्यांवरील मान्यता नसलेल्या शॅक्सवर कारवाई

याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते

Rajat Sawant

Goa Illegal Shacks : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नसलेली कांदोळी, कळंगुट किनाऱ्यावरील शॅक्स सील करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण 9 पथकांची नियुक्ती केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. दरम्यान या कारवाईमुळे शॅक्स चालक, मालकांचे धाबे दणाणले आहेत.

कांदोळी, कळंगुट समुद्रकिनारी 161 शॅक्स 'कन्सेंट टू ऑपरेट' हा मंडळाचा परवाना नसताना चालू असल्याची माहिती महामंडळातर्फे उच्च न्यायालयासमोर एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी सादर केली होती तसेच ते शॅक्स चालू असल्याचेही मंडळाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर न्यायालयाने हे शॅक्स बंद करण्याचे निर्देश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम सुरु केली. यात ज्यांच्याकडे मंडळाचा परवाना नाही ते शॅक्स बंद करण्यात येत आहेत.

दरम्यान शॅक्स चालवण्यासाठी गोवा प्रदूषण मंडळाची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी शॅक्स चालक मालकांनी धाव घेतली असून अर्ज केले आहेत. कारवाई करणाऱ्या पथकांमध्ये मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

समुद्रकिनारी शांतता क्षेत्रात संगीत वाजवण्यास बंदी आहे. तसेच मोरजी व मांद्रे येथील किनारी भागात कासव संवर्धन क्षेत्रही अधिसूचित केले असताना संबंधित यंत्रणा त्याकडे डोळेझाक करत असल्याने मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शॅक्स वा आस्थापनांच्या परवान्यांची तपासणीही केली जात नसल्याने सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाने बोट ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT