Queeninagar Verna Accident Dainik Gomantak
गोवा

Queeninagar Accident: क्विनीनगरात मोठा अपघात! चालकाचा ताबा सुटून खासगी बस उलटली; वाहक जागीच ठार, 32 प्रवासी जखमी

Queeninagar Bus Accident: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेर्णाहून वास्कोला भरधाव वेगाने जाताना उपासनगर (क्विनीनगर) येथे बसचालक अकबर याचे बसवरील ताबा सुटला.

Sameer Panditrao

वास्को: वेर्ण्याहून वास्कोला येणारी खासगी प्रवासी बस (जीए-०६ टी १६७५) ही बस आज, गुरुवारी दुपारी ४.१५ च्या दरम्यान क्विनीनगर-वेर्णा महामार्गावर उलटली. या भीषण अपघातात कंडक्टर शिवा मदार (२३) हा जागीच ठार झाला, तर ३२ प्रवासी जखमी झाले. उपचारानंतर काहींजणाना घरी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेर्णाहून वास्कोला भरधाव वेगाने जाताना उपासनगर (क्विनीनगर) येथे बसचालक अकबर याचे बसवरील ताबा सुटला व बस महामार्गावर दुभाजकाला धडक देऊन उलटली, यात ३२ प्रवासी जखमी झाले. यावेळी बस कंडक्टर बसचा दरवाजा उघडा ठेवून लोंबकळत होता, असे एका प्रवाशाने सांगितले.

तो चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. तर जखमींना तातडीने चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, मुरगाव पोलिस उप अधीक्षक गुरुदास कदम, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, पोलिस निरीक्षक शेरीफ जाकीस घटनास्थळी हजर होते.

५ रुग्णवाहिका दाखल

अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिका १०८ तेथे बोलावण्यात आल्या. ५ रुग्णवाहिका दाखल होताच, प्रवाशांना प्राथमिक उपचार करून त्यांना कासावली आरोग्य केंद्र इस्पितळ, चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. वेर्णा भागातून आलेल्या १०८ने नऊ जणांना, लोटली व दाबोळीहून आलेल्या रुग्णवाहिकांना प्रत्येकी एक, झुआरी महामार्गावर असलेल्या १०८मधून १३ जणांना तर वास्कोहून आलेल्या रुग्णवाहिकेतून ४ जणांना इस्पितळात नेण्यात आले.

प्रवाशांसाठी ‘रेस’

बस चालक व कंडक्टर यांचा मनमानी कारभार चालू असून त्याचा नाहक त्रास लोकांना सोसावा लागतो. प्रवासी घेण्यासाठी बस चालक शर्यत लावतात, तसेच कंडक्टर दार उघडे ठेवून दरवाजावर लोंबकळत उभा राहतो. सकाळी ७.३०ते १० व संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत बसची रेस चालू असते. या खासगी बसचालकावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. नाहीतर हे बसवाले लोकांचे जीव धोक्यात घालत राहणार, असे येथील रहिवासी नारायण नाईक यांनी सांगितले.

Sangeum Accident

अपघातस्थळी विखुरल्या चपला, काचा, पर्स

लोकांनी बसमधील प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे काम सुरु केले.बसच्या कांच्यामुळे बसमधील काही प्रवाशांना जखमा झाल्या. काहीच्या डोक्यांना जखमा झाल्या.सगळीकडे काचांचे तुकडे पडले होते. प्रवाशांच्या चप्पला, महिलांचे पर्स,इतर सामान सगळीकडे विखुरले होते.

कदंब बसेस वाढवा!

या दुर्घटनेची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाज घटनास्थळी धावून आले व अपघाताची पाहणी केली. अशा खासगी बसेसवर कडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना व पोलिसांना दिला. दरम्यान वेर्णा ते बिर्ला, वास्को या मार्गावर सकाळी ७ ते १० व संध्या. ४ ते ७ यावेळेत खासगी बस बंद करून कदंब बसेस वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली.

खोदलेल्या रस्त्याचा परिणाम?

सध्या क्वीनीनगर ते दाबोळी –बोगमाळो महामार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरू असून रस्ता खोदला आहे. रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरून सावधगिरीने वाहने हाकण्याची गरज असते. तथापि मिनीबस चालक वेगाने बस हाकतात. प्रसंगी चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

SCROLL FOR NEXT