Road Potholes Dainik Gomantak
गोवा

Assagao: रस्ते दुरुस्त करा अन्यथा बेमुदत उपोषण! खासगी बसमालकांना स्थानिकांचा पाठिंबा

Assagao Bad Road Problem: नादुरुस्त रस्त्यांच्या प्रश्नांवरून पुकारलेल्या आंदोलनास पंचायत मंडळाचा पूर्ण पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली: आसगाव येथील मुख्य रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे खासगी बस मालकांना होणारा मनःस्ताप व आर्थिक भुर्दंड या कारणांवरून शनिवारी छेडण्यात आलेल्या आंदोलनास स्थानिकांचा प्रतिसाद मिळत आहे,असे सांगून बस मालक श्‍याम गोवेकर यांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती हाती न घेतल्यास येत्या रविवारपासून बेमुदत उपोषणास बसण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

दरम्यान, आसगावच्या नादुरुस्त रस्त्यांच्या प्रश्नांवरून पुकारलेल्या आंदोलनास पंचायत मंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासगी बस मालकांनी सांगितले. रस्त्यांच्या दुर्दशेवरून खुद्द पंचायत मंडळ गेले सहा महिने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्थानिक ‘व्हीडीसी’ समिती समवेत पाठपुरावा करत आहे, परंतु संबंधित अधिकारी याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सरपंच हनुमंत नाईक यांनी सांगितले.

‘साबांखा’समोर उपोषण करा!

बस मालक श्‍याम गोवेकर तसेच इतरांनी शनिवारच्या आक्रोश आंदोलनानंतर पंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे. हे उपोषण पंचायत कार्यालयाऐवजी साबांखा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू करावे,असे मंडळातर्फे सरपंच हनुमंत नाईक यांनी त्यांना आवाहन केले आहे.

रस्त्यांकडे ‘साबांखा’चे दुर्लक्ष !

आमदार दिलायला लोबो, आसगाव पंचायत मंडळ तसेच स्थानिक व्हीडीसी समिती समवेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची पणजीत प्रत्यक्षात भेट घेऊन येथील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची त्यांना वेळोवेळी माहिती दिली होती, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले असते तर आजची स्थिती उद्भवली नसती असे सरपंच नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT