पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात आयोजित 'भारत उर्जा सप्ताह 2024' चे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी उपस्थित होते.
'जगात उर्जेची मागणी वाढली असताना देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात किफायतशीर उर्जा पोहोचवण्याचे काम देशात सुरु आहे. भारतात मागील काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले आहेत. देशाने 100 टक्के वीज पुरवठ्याचे लक्ष पूर्ण केले आहे. भारत 21 शतकातील आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.'
'देशात निर्माण होणारे रस्ते, रेल्वेमार्ग किंवा इतर पायाभूत सुविधांना उर्जेची गरज भासणारच आहे,' असे मोदी म्हणाले.
त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओएनजीसी सी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन केले.
जागतिक मानकांनुसार एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटर म्हणून विकसित केले गेले आहे. यात दरवर्षी 10,000-15,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
'जगभरातील तज्ञ भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे मानत आहेत. यात उर्जेची सर्वात मोठी भूमिका आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा उर्जा, इंधन आणि एलपीजी गॅस ग्राहक आहे,' अशी माहिती मोदींनी दिली.
'उर्जा सप्ताहाचे गोव्यात आयोजन होत आहे. गोवा आदारतिथ्यासाठी ओळखला जातो. गोवा विकास क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. आपण ज्यावेळी पर्यावरण संवेदनशीलता आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र आलो आहोत त्यासाठी गोवा परफेक्ट लोकेशन आहे. या सप्ताहासाठी आलेले सर्व परदेशी पाहुणे गोव्यातून आयुष्यभरासाठी एक वेगळा अनुभव घेऊन जातील असा मला विश्वास आहे.'
'उर्जा सप्ताह महत्वाच्या कालखंडात होत, या वर्षाच्या मागील सहा महिन्यात भारताचा जीडीपी दर 7.5 टक्क्याहून अधिक झाला आहे. हा दर जागतिक वाढीचा अंदाज बांधला जात आहे त्यापेक्षा अधिक आहे. भारत सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असून, आयएमएफने देखील देश असाच प्रगती करेल, अशी भविष्यवाणी केलीय,' असे वक्तव्य मोदींनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.