Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: गोवा सरकारच्या 'या' उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक; ट्विट करत म्हणाले...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात अक्षय ऊर्जेला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचा व्हिडिओ ‘ट्विटर’वर अपलोड केला होता. या ट्विटला पंतप्रधानांनी रिट्विट करत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Prime Minister Narendra Modi: गोवा सरकारच्या वतीने अक्षय ऊर्जेच्या बाबतीत केले जाणारे प्रयत्न राज्याच्या शाश्‍वत हितासाठी प्रेरक आणि चालना देणारे ठरतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात अक्षय ऊर्जेला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचा व्हिडिओ ‘ट्विटर’वर अपलोड केला होता. या ट्विटला पंतप्रधानांनी रिट्विट करत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले आहे.

गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि वीज विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी गोव्याला शाश्वत विकासाच्या मार्गाची वाट मोकळी करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, “गोव्याला सौरउर्जेचा उपयोग करताना पाहून आनंद झाला. हा सहयोगी प्रयत्न शाश्वत विकासाला चालना देईल.”

सावंत म्हणाले, “राज्यभर सौरऊर्जेवर आधारित घरे स्थापन करण्याच्या दृष्टीकोनातून गोवा सरकार पंतप्रधान मोदींनी ठरवलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर चालत आहे.

या प्रयत्नातून राज्य हरित आणि अधिक शाश्वत भविष्याकडे लक्षणीय प्रगती करत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT