Amit Shah and Narendra Modi
Amit Shah and Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा येणार गोवा दौऱ्यावर

दैनिक गोमन्तक

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख राष्ट्रीय नेते गोव्यात भाजपच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी रविवारी या दौऱ्याबद्दल माहिती दिली. (Amit Shah and Narendra Modi Goa Assembly Election)

तानावडे म्हणाले, निवडणूक आयोगाने (Election Commission) जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून मोदी, शहा आणि पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते 28 जानेवारीपासून पक्षाच्या प्रचार करतील.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना तानावडे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि स्मृती इराणी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा; भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सहप्रभारी जी. किशन रेड्डी आणि दर्शना जरदोश हे गोव्यातील पक्षाच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.

या कालावधीत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले. “येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल यात शंका नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता भाजपलाच (BJP) मत देईल," असे तानावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT