PM Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी गोव्यात, जाणून घ्या त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. गोव्यात सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून विकसित झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विमानतळाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते नोव्हेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती.

(PM Narendra Modi)

तसेच गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (एनआययुएम), गाझियाबाद आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था (एनआयएच), दिल्ली या तीन राष्ट्रीय संस्थांचे लोकार्पण होणार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घोषित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयुषच्या 'या' तीन प्रकल्पांचे होणार लोकार्पण

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल यांनी 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस (डब्ल्यूएसी) ची माहिती दिली, गोव्यामध्ये पणजी इथं होणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून, आयुष वैद्यकीय प्रणालीची वैज्ञानिकता, परिणामकारकता आणि सामर्थ्य जागतिक स्तरावर प्रदर्शित केले जाईल.

आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांच्यासह आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. 11डिसेंबर रोजी गोव्यामध्ये होणार्‍या डब्ल्यूएसीच्या समापन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.

या संस्थांची स्थापना, पंतप्रधानांच्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा विस्तार आणि संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले. या संस्थांच्या माध्यमातून देशाचा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक प्रदेशात परवडण्याजोग्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची भारत सरकारची क्षमता आणखी मजबूत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT