Accused Suleman Khan And Police Constable Amit Naik Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: पोलिसानेच केली फितुरी! गोवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी पोलिस कॉन्स्टेबलसोबत कोठडीतून पसार

Land Grabbing Accused Suleman Khan: गेल्या साडेचार वर्षापासून सुलेमान फरार होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील जमीन हडप घोटाळा यासह विविध तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी गोवा पोलिसांच्या कोठडीतून पसार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला पसार व्हायला देखरेखीसाठी ठेवलेल्या कॉन्स्टेबलनेच मदत केलीय. आरोपी सुलमान खान आणि कॉन्स्टेबल दोघेही दुचाकीवरुन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी (१३ डिसेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

सुलेमान खान (वय ५५) असे अटक गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात जमीन हडप प्रकरण आणि इतर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने मोठ्या प्रयत्नानंतर १२ डिसेंबर रोजी त्याला अटक केली होती. गेल्या साडेचार वर्षापासून सुलेमान फरार होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुलेमानला गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने आरोपी सुलेमानला १३ डिसेंबर पहाटे अडीच वाजता कोठडीतून बाहेर काढले. दोघेही नाईक याच्या यमाहा बाईकवरुन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी जुने गोवे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फरार आरोपी सुलेमान शेख आणि कॉन्स्टेबल अमित नाईक याचा गोवा पोलिस शोध घेत आहेत. राज्यातील तसेच सीमा भागातील पोलिसांना दोघांच्या फरार होण्याची माहिती देण्यात आलीय.

कर्तव्यावर असणाऱ्या कॉन्स्टेबलने सुलेमान खान याला मदत केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी अहवाल दाखल केला जाईल. सुलेमानला विशेष वागणूक दिल्याचे आरोप खोटे आणि तथ्यहिन आहेत. दरम्यान, कोठडीची सुरक्षा पाहणारे अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची वरिष्ठांच्या मदतीने चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT