Savitri Kavalekar Dainik Gomantak 
गोवा

नेत्रावळीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार; सावित्री कवळेकर

अजूनही आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्ते पुरवण्यात लोकप्रतिनिधी का कमी पडले? सावित्री कवळेकर यांचा सवाल

दैनिक गोमन्तक

सांगे : लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताच नेत्रावळीसाठी आपले स्वतंत्र कार्यालय खुले करून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. तसेच नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील डोंगराळ भागाचा विचार करून नेत्रावळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्‍याबरोबरच सांगे (Sanguem) प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवण्यात येणार असल्याची घोषणा सांगेच्‍या अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांनी केली.

नेत्रावळी येथील कोपरा बैठकीत सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) बोलत होत्‍या. यावेळी व्यासपीठावर नवनाथ नाईक, महेश गावकर, उदय गावकर, सदानंद गावडे, सुदेश भंडारी, जानू झोरे उपस्थित होते.

पुढे बोलताना सावित्री म्हणाल्या की, ग्रामीण भागाचा विकास झाला असेल तर अजूनही आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्ते पुरवण्यात लोकप्रतिनिधी का कमी पडले? नेटवर्कची समस्या का सोडवली नाही? कोविड (covid) महामारीत हेच लोकप्रतिनिधी पोटल्यांची विक्री करीत होते, मग समाजसेवा कसली केली? अशा लोकांना पुन्‍हा संधी देऊन पाच वर्षे वाया घालवण्यापेक्षा विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्‍यांनी मतदारांना केले.

महेश गावकर म्हणाले, यावेळी माजी आमदारांना (MLA) संधी न देता भयमुक्त सांगेसाठी सावित्री कवळेकर यांना निवडून देणे गरजेचे आहे. तर, सदानंद गावडे यांनी सांगितले की, आम्ही दोन्ही माजी आमदारांची कार्यपद्धती पाहिली आहे. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. त्‍यामुळेच सांगेच्या जनतेने सावित्री कवळेकर यांनाच निवडून देण्याचा निर्धार केला आहे.

नवनाथ नाईक म्हणाले की, सांगेसारख्या ग्रामीण भागातून सावित्री कवळेकर यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक वावड्या उठवू लागले आहेत. त्यावर विश्‍‍वास ठेवू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT