युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते  Dainik Gomantak
गोवा

युगोडेपा पक्षाचे अध्यक्ष डॉ. जॉर्सन फेर्नांडिस यांचा राजीनामा

गोव्यातील जनता भाजप (BJP) सरकारला विटली असून या सरकारला (Government) घरी पाठविणे हेच लोकांचे ध्येय आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष डॉ. जॉर्सन फेर्नांडिस (Dr. Jorson Fernandes) यांनी आज युगोडेपा पक्षाचा राजीनामा दिला. आपण लवकरच तृणमुल पक्षात प्रवेश करणार असे त्यांनी आज जाहीर केले.

गोव्यात (Goa) भाजपला (BJP) हरवायचे असेल तर मजबूत संघटन असलेल्या पक्षाची गरज आहे. त्यासाठी प्रादेशिक पक्षांची ताकद कमी पडत असल्याने आपण तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे डॉ. फेर्नांडिस यानी सांगितले.

युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासियस व महासचिव आनाक्लेत व्हिएगस यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानी ही घोषणा केली.

पक्षाचे अध्यक्ष फेर्नांडिस जरी पक्ष सोडून जात असले यारी युगोडेपा पक्षाचे अस्तित्व कायम राहणार आहे. डॉ. फेर्नांडिस याना तृणमुलची काँग्रेस उमेदवारी मिळाल्यास युगोडेपा त्यांना पाठिंबा देणार मात्र इतर ठिकाणी कुणाला पाठिंबा द्यायचा की उमेदवार उतरवायचे याचा निर्णय पक्ष राजकीय घडामोडींचा अंदाज घेतल्यावर घेईल असे यावेळी व्हिएगस यांनी सांगितले.

सध्या गोव्यातील जनता भाजप (BJP) सरकारला विटली असून या सरकारला घरी पाठविणे हेच लोकांचे ध्येय आहे. यासाठी युगोडेपाही प्रयत्नरत असेल असे पक्षाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासियस यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT