President Droupadi Murmu Goa Visit Dainik Gomantak
गोवा

President Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार गोवा दौऱ्यावर; दिवस, उद्देश जाणून घ्या

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात तवडकरांनी याबाबत माहिती दिली.

Pramod Yadav

President Droupadi  Murmu Goa Visit: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोवा दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात तवडकरांनी याबाबत माहिती दिली.

गोवा विधानसभेचे 18 दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज समाप्त झाले. देशाच्या राष्ट्रापती द्रौपदी मुर्मू 23 ऑगस्ट रोजी गोव्यात येणार आहेत अशी माहिती अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभापती तवडकरांनी सभागृहात दिली.

राष्ट्रपती चार वाजता गोव्यात येतील आणि राज्यातील सर्व आमदारांना संबोधित करतील असेही तवडकर म्हणाले. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन तवडकरांनी आमदारांना केले.

गेल्या वर्षी अधिवेशन काळातच राष्ट्रपती मुर्मू गोव्यात आल्या होत्या.

मागील वर्षी गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याचवेळी राष्ट्रपती पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू गोव्यात आल्या होत्या. यावेळी त्याच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे देखील उपस्थित होते.

अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि भाजप आमदार मुर्मू यांची भेट घेण्यासाठी गेल्यानंतर सभागृहात गोंधाळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, यावेळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू गोव्यात येत असून, सर्व आमदारांना त्या संबोधित करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT