President Droupadi Murmu Goa Visit Dainik Gomantak
गोवा

President Droupadi Murmu Goa Visit: प्रवाशांच्या डोक्याला ताप! दाबोळी विमानतळावरून संध्याकाळी फ्लाईट असेल तर दुपारीच या...

राज्य पोलिसांनी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये रहदारीची माहिती

Kavya Powar

President Droupadi Murmu Goa Visit

आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

प्रतिबंधित रहदारीमुळे मंगळवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावरून उड्डाणे असणाऱ्यांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

राज्य पोलिसांनी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, दाबोळी ते दोना पावला आणि पुढे पणजी शहरातील रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी दुपारी 3.15 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मर्यादित असेल.

राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सोमवारी ट्विटरवर पोस्टद्वारे माहिती दिली की, 'माननीय राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ज्या प्रवाशांना दाबोळी येथून उड्डाण करायचे आहे, ज्यांच्या संध्याकाळी 5, 6 आणि संध्याकाळी 7 वाजता फ्लाईट आहेत त्यांनी दुपारी 3.30 पर्यंत विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. कारण दाबोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी 3.45 नंतर वाहतूक प्रतिबंधित केली जाणार आहे.'

'हे' रस्ते असणार बंद...

  • NH 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा

  • NH 66 वेर्णा ते बांबोळी

  • गोवा मेडिकल कॉलेज ते दोना पावला

  • दोना पावला ते मिरामार

  • मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा

  • राजभवन ते बांबोळी

  • NH 66 बांबोळी ते पर्वरी

  • अटलसेतू

राष्ट्रपती मंगळवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावेळी राज्य विधानसभेला संबोधित करतील आणि गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT