vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

'राष्ट्रपतींबद्दल आदर पण भाजपच्या ढोंगीपणाचा मला कंटाळा आलाय', विजय सरदेसाईंनी मुर्मूंच्या भाषणाला दांडी का मारली?

सरदेसाई यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार टीका करत कार्यक्रमाला गैरहजर का राहिले याचे कारण सांगितले आहे.

Pramod Yadav

Why MLA Vijai Sardesai Skip President Droupadi Murmu Goa Assembly speech: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील आमदारांना विधानभवनात संबोधित केले. राष्ट्रपतींच्या या कार्यक्रमाला सर्व आमदारांना निमंत्रण देण्याता आले होते. त्याप्रमाणे विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह विरोधी पक्षातील व सत्ता पक्षातील आमदारांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.

पण, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. सरदेसाई यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार टीका करत कार्यक्रमाला गैरहजर का राहिले याचे कारण सांगितले आहे.

'राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा मलाही निमंत्रण होते. आदरणीय राष्ट्रपतींबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने गोवा आणि गोमन्तकीयांप्रती दाखवलेल्या ढोंगीपणाचा मला कंटाळा अला असून, मीच या कार्यक्रमापासून दूर राहिलो.'

'आरक्षणाच्या बाबतीत एसटी समाजासोबत केलेला विश्वासघात असो किंवा म्हादई आणि कोळशाच्या बाबतीत गोवावासीयांचा केलेला विश्वासघात कुठल्याही प्रकारचा दैदिप्यमान कार्यक्रम हिरावून घेऊ शकत नाही. मी या विश्वासघाताचा विरोध करतो.' असे ट्विट आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

'गोव्याला गृहीत धरणे थांबवा; विधानसभेत आणि त्या बाहेरही मी एकटा उभा असलो तरी मी आत्मविश्वास आणि धैर्याने ही बाब सांगतो.' असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभेतील भाषणात गोव्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे कौतुक केले तसेच, राज्यातील आमदारांना राज्य तसेच, देशाच्या विकास व एकतेसाठी काम करण्याचा सल्ला दिला.

गोवा विकासाचे असे मॉडेल निर्माण करावे जे देशातील अन्य राज्यांसाठी एक उदाहरण ठरेल, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. गोव्यातील नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून आणि समुद्र किनाऱ्यांच्या मर्यादा लक्षात घेत कर्मठ गोमन्तकीयांच्या सोबतीने हे लक्ष्य साध्य करतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT