Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: लोकसंस्कृतीचे संवर्धन करणे विद्यार्थ्याच्या हाती- प्राचार्य रियाज जमादार

वाळपईच्या सरकारी विद्यालयात लोकनृत्य स्पर्धेचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील लोककलेचे, लोकवेदाचे, लोकसंस्कृतीचे संवर्धन करणे आजच्या विद्यार्थ्याच्या हाती आहे. त्याना त्याची जाणिव करून देणे प्रत्येक विद्यालयाचे व शिक्षकांचे काम आहे. कारण अशा संधी उपलब्द करून दिल्यानेच त्याच्यातील कलाकार घडू शकेल.असे प्राचार्य रियाज जमादार यांनी सांगितले. वाळपई येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या लोकनृत्य स्पर्धा उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

व्यासपीठावर मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, जेष्ठ शिक्षक प्रशांत नाईक, स्पर्धेचे परिक्षक नाट्यकर्मी प्रमोद म्हाडेश्वर, लोककला प्रशिक्षक सातू गांवकर उपस्थित होते. मुख्याध्यापक नाईक यांनी प्रास्ताविक केले. उद्‍घाटन सोहळ्याचे सुत्रसंचालन शिक्षिका विद्या म्हाळशेकर हिने केले तर प्रशांत नाईक यांनी आभार मानले.

दाबेतील सरकारी विद्यालय प्रथम

स्पर्धेत प्रथम बक्षीस सरकारी माध्यमिक विद्यालय दाबे तर दुसरी सरकारी माध्यमिक विद्यालय भुईपाल विद्यालय आणि तिसरा क्रमांक सावर्डेतील सरकारी माध्यमिक विद्यालयाने पटकाविला. परीक्षक प्रमोद म्हाडेश्वर यांनी मार्गदर्शनपर लोककला, लोकनृत्य संदर्भात आपले विचार मांडले. स्पर्धेचे सूत्रसंचालन तृप्ती मोरे हिने केले. गीता गाडगीळ हिने आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT